चीनमधील कंपनीचे बनावट ईमेल खाते तयार करून व्यावसायिकाची ३.३ लाख रुपयांची फसवणूक

पवईस्थित एका ५५ वर्षीय व्यावसायिकाची चीनस्थित कंपनीकडून व्यवसायासाठी सुटे भाग मागवण्याच्या बहाण्याने ३.३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. तक्रारदाराने खात्यात पैसे पाठवल्यानंतरही जेव्हा त्याला शिपमेंट प्राप्त झाले नाही तेव्हा त्याने कंपनी आणि बँकेकडे तपासणी केली असता त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी पवई पोलिस ठाण्यात फसवणूक आणि तोतयागिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा पवईमध्ये टेक्स्ट टूल बिझनेस आहे, त्यांनी ई-मेलवर पत्रव्यवहार करत एका चीनी कंपनीला ऑर्डर दिली होती. या व्यवहारासाठी झालेल्या विविध ईमेल ट्रेलमध्ये व्यावसायिकाने ४,५९८ USD म्हणजेच ३.३ समतुल्य मूल्य देण्याचे मान्य केले होते.

“व्यवहार नक्की झाल्यानंतर सदर रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर केल्यानंतर व्यावसायिकाला सदर रक्कमेची पावती देखील मिळाली, मात्र शिपमेंट तक्रारदारापर्यंत पोहोचलेच नाही. याबाबत त्यांनी त्या चिनी कंपनीला पुन्हा पत्र लिहिले, मात्र उत्तर मिळाले नाही, असे पवई पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘पैसे डेबिट झाल्यानंतरही वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही काहीच संपर्क होत नसून, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने तसेच रक्कमही परत मिळत नसल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच व्यावसायिकाने पवई पोलिसांशी संपर्क साधत तक्रार दाखल केली.

पवई पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून, पोलिस तपास सुरू आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!