खंडणी खोराच्या पवई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

तक्रारदार शकिल ‘एफआयआर’ दाखवताना

फिल्टरपाडा येथील दुकानदारांने खंडणी देण्यास नकार दिल्याने त्याला जबर मारहाण करून त्याच्या दुकानाचे नुकसान करणाऱ्या खंडणी खोराच्या पवई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शोयब अमीर खान (२८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार शकील शेख यांचे फिल्टरपाडा येथे सना इंटरप्रायजेस नामक दुकान आहे. आरोपी सुद्धा त्याच परिसरात राहत असून, त्याने शकील यांना तुला धंदा करायचा असेल तर मला हफ्ता द्यावा लागेल असे धमकावले होते. मात्र हप्ता देण्यास नकार दिल्याने शोयबने दुकानाची तोडफोड करत दुकानात सोबत आणलेले पेट्रोल टाकून दुकानातील कामगार हिमांशू याला पैसे दे नाहीतर दुकान पेटवून देईन असे धमकावले.

“शोयब दुकानात तोडफोड करत असल्याची माहिती मिळाल्यावर दुकानावर पोहचलेल्या शकील यांना सुद्धा त्याने विस हजार दे असे धमकावत मारहाण केली. ज्याबाबत आम्ही त्याला अटक केली आहे. त्याच्यावर पोलीस ठाण्यात पूर्वी सुद्धा धमकावणे, मारहाण करणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे.” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

“शोयब मुझे बिस हजार रुपये कि मांग कर रहा था. मैने जब उसे किस लिये चाहिये? पुछा तो उसने सिधा गाली गलोच करते हुवे दुकान चलानी है तो मुझे चुपचाप बिस हजार दे ऐसे बताया | मैरे हफ्ता देने सें इनकार करने पर २० तारीख को उसने मेरे दुकान मे घुसकर तोडफोड कि | इस बारे मे बताने जब मै उसके घर पहुंचा, तो पीछेसें आके उसने चाईनिस पलटी मेरे सर पार मारी, जिसमे मेरे सिर पार चोट आकार ३ टाके पडे है |” असे याबाबत तक्रारदार शकील याने आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.

पवई पोलिसांनी भादवि कलम ३८७, ३२४, ३२३, ४२७, ४५२ नुसार गुन्हा नोंद करून शोयब याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!