पवईत कोरोनामुक्त दहीहंडी

पवईत कोरोनामुक्त दहीहंडी

कोरोनाने देशभर थैमान घातलेला असल्याने याचे सावट दहीकाला उत्सवावर जाणवले. मुंबईतील अनेक मानाच्या आणि मोठ्या हंड्या रद्द करण्यात आल्या. कोरोनामुळे याही उत्सवावर विरजण पडले असताना अनेक ठिकाणी साधेपणाने उत्सव साजरा करण्यात आला. पवईतही कोरोनाची स्थिती पाहता कोरोनामुक्त दहीहंडी साजरी करण्यात आली. शिवसेना शाखाप्रमुख मनिष नायर आणि माजी शाखाप्रमुख धरमनाथ पंत यांच्या संकल्पनेतून ही दहीहंडी साजरी झाली. यावेळी स्थानिक नगरसेविका चंद्रावती मोरे, शाखाप्रमुख सचिन मदने उपस्थित होते.

मुंबईसह देशभर प्रत्येकवर्षी मोठा आकर्षक दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. मुंबई, ठाणे येथील दहीहंडी पाहण्यासाठी देशाच्या विविध ठिकाणांवरून लोक येथे येत असतात. पवईतील अनेक भागात सामाजिक संस्था आणि समाजसेवक यांच्या माध्यमातून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. मात्र यावर्षी अनेक हंडी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्या. पवईतील मोरारजीनगर येथे सुद्धा शाखाप्रमुख मनीष नायर यांच्या माध्यमातून एका मोठ्या हंडीचे आयोजन केले जाते. मात्र यावर्षी कोरोनाचे महासंकट असताना सरकारच्या नियमांच्या आधीन राहून आम्ही कोरोनामुक्त दहिहंडी साजरी करत असल्याचे शिवसेनेचे मनिष नायर यांनी सांगितले.

हिरानंदानी दहीहंडी उत्सव

पवईत कोरोनामुक्त दहीहंडी

पवईतील उच्चभ्रू वस्ती असणाऱ्या हिरानंदानी भागात माजी शिवसेना शाखाप्रमुख धर्मनाथ पंत यांच्या माध्यमातून हिरानंदानी दहीहंडी उत्सव मोठ्या दणक्यात साजरा केला जातो. मात्र यावर्षी कोरोनाच्या परिस्थितीत दहीहंडी उत्सव नेहमी प्रमाणे साजरा न करता आपल्या संस्कृतीला खंड पडू नये म्हणून श्री गणेशनगर महिला गोविंदा पथकाला हंडी फोडण्याचा मान देण्यात आला.

सण, उत्सव हे चालीरिती परंपरा यांचे प्रतिक असते. भावी पिढीला यातून आपली संस्कृतीचे दर्शन घडते. म्हणूनच उत्सव सतत चालू रहावा आणि संस्कृती जपली जावी म्हणून पवईत ती लहानग्यांच्या हस्ते फोडून हा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी यातून कोरोनावर मात करण्याचा संदेश सुद्धा देण्यात आला.

मनसेची दहीहंडी रद्द

कोरोना महामारी आणि उपविभाग अध्यक्ष अशोक जाधव यांच्या आकस्मित निधनामुळे पवईतील मनसे दहीहंडी उत्सव २०२० साजरा करण्यात आला नाही. मात्र यापुढे दहीहंडी उत्सवाची परंपरा कायम सुरु राहणार असल्याचे शाखा अध्यक्ष शैलेश वानखेडे यांनी सांगितले.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!