पवईत नाल्यातील पाण्याचा डिस्को डान्स; उघडा डोळे, बघून चाला, होणारा अपघात टाळा

पहिल्याच पावसात पवईच्या नालेसफाईची पोलखोल

पावसाळ्याच्या सुरुवातीला नालेसफाई आणि पावसाळ्यापूर्व कामे पूर्ण झाल्याचा गाजावाजा करणाऱ्या पालिका आणि लोकप्रतिनिधींची पहिल्याच पावसात पोलखोल होत असते. पवईमध्ये देखील सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या पावसामुळे पालिका आणि लोक प्रतिनिधींनी केलेल्या कामांचे पितळ उघडे पडलेले पाहायला मिळाले.

दोन दिवस सतत सुरु असणाऱ्या पावसाने आणि मंगळवारी पावसाचा जोर वाढल्याने पवईत ठिकठिकाणी नाले तुडुंब भरून वाहताना दिसले. पवईतील चैतन्यनगर, इंदिरानगर, माता रमाबाई आंबेडकर नगर, हिरानंदानी संकुल अशा बऱ्याच ठिकाणी पाणी साचून राहत पावसाळ्यापूर्वी झालेल्या नालेसफाईची आणि कामांची पोलखोल झाली.

पावसाळ्यात मुसळधार पाऊस, तुडुंब भरून वाहणारे नाले, रस्त्यांवर साचलेले पाणी हे मुंबईकरांना, पवईकरांना नवीन नाही. परंतु नालेसफाई न झाल्याने नाल्यातील पाण्याच्या दबावामुळे झाकण वर येऊन पाणी नाल्यातुन बाहेर येत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाह्यला मिळाले.

हिरानंदानी संकुलात असलेल्या हिरानंदानी रुग्णालय जवळील नाल्यातून बाहेर पडणारे पाणी तर चक्क डिस्को डान्स करताना दिसले.

स्थानिक नागरिकांनी याबाबत बोलताना सांगितले की, “पावसामुळे तुडुंब भरून वाहणारे नाले आणि त्यातुन बाहेर पडत साचलेल्या पाण्यातून वाट काढणे अवघड जाते. उघडी गटारे आणि खड्डे यात पडुन अपघात होत असतात. त्यामुळे नागरिकांनी “उघडा डोळे, बघुन चाला” होणारे अपघात टाळा”.

सोशल माध्यमात आवर्तन पवईने टाकलेल्या व्हिडीओवर कमेंटमधून, ‘हिरानंदानी रुग्णालय जवळील नाल्याच्या बाजूलाच एक जुने मोठे पिंपळाचे झाड असल्याने या भागात नालेसफाईला अडचण येत असल्याची माहिती समोर येत आहे, मात्र इतर भागांचे काय?

, , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!