नाट्य स्पर्धेत पवई इंग्लिश हायस्कूलला द्वितीय पुरस्कार

पवई इंग्लिश हायस्कूलच्या (पीईएचएस) विद्यार्थ्यांनी शिक्षणासह नाटक आणि परफॉर्मिंग आर्टचे महत्त्व कायम ठेवत सलाम बॉम्बे फाउंडेशन कला अकादमी आयोजित आंतरशालेय कला महोत्सव २०१९ स्पर्धेत नाट्य विभागात दुसरे स्थान मिळवले आहे. विजेत्या विद्यार्थ्यांना थिएटर प्रॉडक्शनमध्ये काम करण्याची किंवा पडद्यामागे मदत करण्याची संधी दिली जाणार आहे.

विद्यार्थ्यांना कौशल्य दाखविता यावे या उद्देशाने “सलाम बॉम्बे फाउंडेशन” क्रीडा, नाटक, कला इत्यादींशी संबंधित विविध उपक्रम आणि स्पर्धा आयोजित करते. सलाम बॉम्बे फाउंडेशन १०० वर्षांहून अधिक काळांचा अनुभव असणारी संस्था आहे. संस्था मुलांना आपल्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक योग्य निवडी करण्यास मदत करण्यासोबतच, शाळेत जावून मूलभूत शिक्षण घेण्यासाठी सुद्धा प्रेरित करते.

नाविन्यपूर्ण शिक्षण मुलांच्या सर्वांगीण वाढीस समर्थन देते. संपूर्ण वाढ मुलाच्या भावनिक, शारीरिक आणि बौद्धिक विकासास प्रेरित करते. पवईतील आयआयटी सारख्या भागात असणारी पवई इंग्लिश हायस्कूल मुलांची विकासाची आवश्यकता ओळखत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा, कला आणि माध्यमांतून अभिनव शिक्षणाची धुरा सांभाळते.

सलाम बॉम्बे फाउंडेशन आणि कला अकादमीच्यावतीने आंतरशालेय कला महोत्सव २०१९ अंतर्गत नाटक, नृत्य आणि संगीत स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेत मुंबईतील अनेक शाळांनी भाग घेतला आणि आपली प्रतिभा दर्शविली. पवई इंग्लिश हायस्कूलनेही यात सहभाग घेत नाट्य स्पर्धेत आपला ठसा उमठवत द्वितीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धेच्या विजेत्या विद्यार्थ्यांना नियमित सन्मानासोबत नाट्य उद्योगातील व्यावसायिक सदस्यांद्वारे प्रशिक्षित करण्याची संधी सुद्धा मिळाली आहे. सोबतच शाळेच्या तीस विद्यार्थ्यांना थिएटर कलाकारांकडून विनामूल्य वर्षासाठी उच्च प्रतीचे प्रशिक्षण मिळेल.

विद्यार्थ्यांनी इतर स्वतंत्र स्पर्धांमध्येही भाग घेतला. बृहन्मुंबई आयोजित कथा कौशल्य स्पर्धेत यशिका थोरातला प्रथम पुरस्कार मिळाला. मराठी साहित्यातील नामांकित व्यक्तिमत्त्व पीएल देशपांडे यांनी लिहिलेल्या “व्याक्ति आणि वल्ली” या पुस्तकातून ही कथा निवडण्यात आली होती. तिला अनघा कुडाळकर यांनी प्रशिक्षण दिले.

विद्यार्थी आणि शिक्षक, माधवी कुळे, अनघा कुडाळकर, अमित खोत, बेट्स बेनी यांच्या पडद्यामागील अथक परिश्रम आणि नियोजन यामुळेच हे शक्य झाले असल्याचे मत यावेळी बोलताना मुख्याध्यापिका शिर्ले उदयकुमार यांनी व्यक्त केले.

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes