झटपट कमाईचा ऑनलाईन फंडा, मनोरंजन कंपनीत काम करणाऱ्याला १.६ लाखाचा गंडा

एका अज्ञात सायबर भामट्याने मनोरंजन कंपनीत काम करणाऱ्याला पवईतील २५ वर्षीय व्यक्तीची १.६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार शनिवारी घडला आहे. तक्रारदाराने वेबसाइटवर विक्रीसाठी ठेवलेल्या रेफ्रिजरेटर आणि फुट मसाजर मशीन खरेदीच्या बहाण्याने सायबर चोरट्याने ही फसवणूक केली आहे.

सायबर चोरट्याने त्या वस्तू खरेदीसाठी तक्रारदार यांच्याशी संपर्क साधला आणि देय स्वीकारण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले. क्यूआर कोड स्कॅन करताच मालिकेच्या व्यवहारात तक्रारदार यांनी पैसे गमावले. पवई पोलिस याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका मनोरंजन कंपनीत नोकरी करणार्‍या फिर्यादीला मुकेश कुमार नामक एका व्यक्तीने २२ मे रोजी फोन केला. सेकंडहँड इलेक्ट्रॉनिक्स सामानाचा विक्रेता म्हणून त्याने आपली ओळख करून देत फिर्यादी याने वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवलेली उत्पादने खरेदी करण्यात रस दर्शविला. किंमतीबद्दल चर्चा करून रेफ्रिजरेटर आणि फुट मसाजर मशीन २२,००० रुपये किंमतीत खरेदीचा व्यवहार नक्की झाला.

मुकेशने पेमेंट करण्यासाठी एक क्यूआर कोड मला पाठवला आणि माझ्या पेटीएम ऍपद्वारे तो स्कॅन करण्यास सांगितला. मी क्यूआर कोड स्कॅन करताच माझ्या खात्यातून १० हजार रुपये डेबिट झाले. मी मुकेशला याबाबत विचारले तेव्हा त्याने मला माझ्या खात्यात पैसे परत मिळवण्यासाठी सहा वेळा प्रक्रिया पुन्हा करावयास सांगितले. या व्यवहारात माझ्या खात्यातून ५९,९९८ रुपये डेबिट झाले. याबाबत विचारणा केली असता यूपीआयच्या पेमेंटमध्ये समस्या असल्याचे दिसते असे त्याने सांगितले,” असे पोलिसांना दिलेल्या जवाबात फिर्यादी यांनी म्हटले आहे.

युपीआय पेमेंटमध्ये समस्या असल्याचे सांगत मुकेशने तक्रारदार यांना नेट बँकिंगद्वारे व्यवहार करण्यास सांगितले. मात्र यावेळीही त्यांच्या खात्यातून पुन्हा पैसे डेबिट झाले. ही प्रक्रिया मोठी असल्याचे सांगत मुकेशने पुन्हा त्यांना व्यवहार करावयास सांगितला आणि पुन्हा त्यांच्या खात्यातून पैसे डेबिट झाले.

“काही वेळाने मुकेशने तक्रारदाराच्या खात्यावर १.५ लाख रुपये पाठविल्या स्क्रीनशॉट पाठविला, परंतु तपासणी केली असता अशी कोणतेही रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झालेले नसल्याचे फिर्यादी यांच्या समोर आले. मुकेशने फिर्यादी यांच्या कॉलकडे दुर्लक्ष करण्यास सुरवात केली आणि फिर्यादीला समजले की त्यांची फसवणूक झाली आहे,” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी आरोपी मुकेश याच्यावर भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमान्वये फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. पेमेंट रोखण्यासाठी बँकेच्या नोडल अधिकाऱ्याला पत्र दिले असून, अधिक तपास सुरू आहे.

, , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!