अमेरिकन आर्मीमध्ये अधिकारी असल्याचे सांगून फेसबुकवर महिलेला गंडा

तीन लोकांच्या टोळीतील एकाला पवई पोलिसांनी केली अटक

online-scamक ४८ वर्षीय महिलेशी फेसबुक या सोशलसाईटवर अमेरिकन आर्मीत अधिकारी आहे आणि अफगाणिस्तान येथे पोस्टिंग असल्याचे सांगून, मैत्री करून ३ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या टोळीतील एकाला दिल्ली येथून पवई पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. रिचर्ड डेविड शेम्री (३०) असे अटक आरोपीचे नाव असून, अधिक तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलीस त्याच्याकडे त्याच्या इतर साथीदारांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

पवई येथील एका उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या गृहिणीला ‘मायकल कॉलेमन’ नामक व्यक्तीने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. ज्यात त्याने आपली ओळख तो अमेरिकन आर्मीमध्ये अधिकारी असून, अफगाणिस्तान येथे त्याची पोस्टिंग झाली आहे. पत्नी काही वर्षापूर्वीच वारली आहे आणि तो अनाथ आहे, अशी माहिती दिली होती.

फिर्यादीचा पूर्ण विश्वास संपादन झाल्यानंतर त्याने त्याच्या पश्चात कोणीच नसल्याने त्याच्या मृत्यूनंतर सर्व काही फिर्यादी यांचे होईल असे सांगून आपला एक मित्र ऑस्टिन जोएल याच्याशी तिची ओळख करून दिली.

“ऑस्टिन याने मायकल याचे सर्व मेडलस, बक्षिसे आणि पैसे कस्टममधून सोडवावे लागेल असे सांगून त्यासाठी फिर्यादीकडे पैशांची मागणी केली. फिर्यादीने पैसे दिल्यानंतरही जेव्हा सामान पोहचले नाही, तेव्हा आपली फसवणूक झाली आहे हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी पवई पोलीस स्टेशनला येऊन २७ जून रोजी तक्रार केली होती” असे आवर्तन पवईशी बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

“तपासात आम्हाला दिल्ली येथील एक एटीएममधून पैसे काढले असल्याचे समोर आले. ज्याच्या आधारावर आम्ही दिल्ली येथील एका बिपीओमध्ये काम करणाऱ्या रिचर्ड डेविड शेम्री याला अटक केली असून, त्याच्याकडे आम्ही त्याच्या अजून साथीदारांची माहिती घेत आहोत” असे यावेळी बोलताना तपासी अधिकाऱ्याने सांगितले.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!