लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

वईत एका १९ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या व गर्भपात करण्यास दबाव टाकणाऱ्या दोघा भावांना पवई पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. अजय बनसोडे व बालभिम बनसोडे असे अटक तरुणांची नावे आहेत. अजयवर बलात्काराचा तर त्याचा भाऊ बालभिमवर गर्भपातास प्रवृत्त करण्याचा आरोप आहे.

अजय व पिडीत तरुणी हे पवईतील एकाच परिसरात राहतात. त्यांचे गेल्या काही वर्षापासून एकमेकांवर प्रेम होते. याचाच फायदा घेत अजयने पिडीत तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी अनेकदा शारीरिक संबंध ठेवले होते.

प्रेमसंबंधाबाबत माहिती मिळताच तरुणीच्या वडिलांनी तिचे दुसऱ्या ठिकाणी लग्न लावून दिले होते, मात्र अजयच्या प्रेमात भूललेल्या तरुणीने काही दिवसातच पतीचे घर सोडत ती वडीलांच्या घरी परतली होती. अजयशी असणारे तिचे संबंध त्यानंतरही सुरूच होते.

काही दिवसाने अजयने तिला भेटण्यास टाळाटाळ करत लग्नासही नकार दिल्याने अखेर तिने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ज्यानंतर पवई पोलिसांनी अजय व बालभिम यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

दोघांनाही स्थानिक कोर्टात हजर केले असता १५ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!