गणेशनगरमधील रहिवाशांची ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ला ७६ हजाराची मदत

मुख्यमंत्री सहाय्यता निधीकोरोना विषाणूपासून होणाऱ्या  कोविड -१९ (COVID- 19) आजाराला रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यांच्या या कार्यात हातभार लागावा म्हणून पवईतील गणेशनगर भागातील रहिवाशांनी पुढाकार घेत ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड-१९’ला ७६,५०० रुपयांची मदत केली आहे. तर, याच भागातील श्री गणेश मंदिर गणेशनगर रहिवाशी मंडळ (दुर्वाप्रिया गजानन मंदिर) यांच्याकडून २५ हजाराची सहाय्यता करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनातर्फे भारतीय स्टेट बँकेत यासाठी बनवण्यात आलेल्या मुख्यमंत्री  सहाय्यता  निधी – कोविड-१९ या स्वतंत्र बँक खात्यात आज रोख रक्कम आणि चेक जमा करण्यात आला आहे.

कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कोविड-१९ या नव्या खात्याची  निर्मिती करण्यात आली आहे. या खात्यात उद्योजक, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, नागरिकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीस्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करत आहेत. याच पार्श्वभूमीवर पवईतील गणेशनगर भागात राहणाऱ्या रहिवाशांनी एकत्रित येत सढळ हाताने या कार्यात मदत करत ७६,५०० रुपये रोकड जमा केली. सोबतच या परिसरात असणाऱ्या श्री गणेश मंदिर गणेशनगर रहिवाशी मंडळ यांनीही मदतीचा हात पुढे करत २५ हजाराची मदत केली आहे.

“नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत नागरिकांनी आपआपल्या परीने मदत केली. या मदतीतून जमा झालेले रोख रक्कम आणि मंदिर व्यवस्थापनाने दिलेला चेक आम्ही मदतीसाठी बनवण्यात आलेल्या खात्यात जमा केला आहे.” असे याबाबत बोलताना येथील नागरिकांनी सांगितले.

फुलोरा सोसायटीतर्फे सुद्धा दहा हजाराची मदत

गणेशनगर येथील रहिवाशी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत जमा करत असल्याची माहिती मिळताच आयआयटी पवई येथे असणाऱ्या फुलोरा सोसायटीतर्फे सुद्धा १० हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे.

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकइन्स्टाग्रामट्विटरयूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!