पवई अनैसर्गिक लैंगिक अत्याचार घटनेतील आरोपींना पाहणारा साक्षीदार मिळाला

वईतील गौतमनगर येथे शालेय विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना ओळखणारा एक साक्षीदार पवई पोलिसांना मिळाला आहे. त्याच्या साक्षीच्या आधारावर पवई पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहेत. वाचलेल्या मुलाचे यकृत निकामी झाले असून, डॉक्टरांनी त्याला प्रत्यारोपणाचा सल्ला दिला आहे.

गेल्या आठवड्यात गौतमनगर येथे राहणाऱ्या १३ वर्षाच्या मुलाला अचानक उलट्या होऊ लागल्याने त्याच्या पालकांनी त्याला दवाखान्यात दाखल केले होते. जिथे त्याने उंदीर मारण्याचे विष घेतल्याचे व त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार झाल्याचेही तपासणीत समोर आले होते.

१३ वर्षीय मुलगा शुद्धीवर आल्यावर त्याने आपल्या व १० वर्षीय साथीदारासोबत झालेला सगळा प्रकार आईला सांगितला. त्याच आधारावर पवई पोलिसांनी भादवि कलम ३७७ व पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे. चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांना अत्याचार झालेल्या १० वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

१३ वर्षीय मुलावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु असून, त्याचे यकृत निकामी झाल्याने तो कोमात गेला आहे. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला आहे.

“काहीच धागेदोरे नसल्यामुळे आम्ही यापूर्वी पवई पोलीस ठाण्यात तपासी अधिकारी म्हणून काम केलेल्या सर्व अधिकाऱ्यांना बोलवून पोलीस उपायुक्त, विविध विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेवून आपली खबऱ्याची सर्व यंत्रणा कामाला लावायला सांगितले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्हाला त्या मुलांना घेवून जाणाऱ्या आरोपींची ओळख करणारा एक साक्षीदार मिळाला आहे आणि लवकरच सर्व आरोपी आमच्या ताब्यात असतील”, असे याबाबत बोलताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!