आयआयटी मुंबई देशात पुन्हा नंबर वन

जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची क्रमवारी ‘क्यूएस युनिव्हर्सिटी रँकिंग’ नुकतीच जाहीर झाली आहे. या सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या क्रमवारीत पुन्हा बाजी मारत देशातील विद्यापीठांमध्ये आयआयटी मुंबई नंबर एकवर कायम राहिले आहे. आयआयटी मुंबईने जागतिक क्रमवारीत १७२ वा क्रमांक मिळवला आहे.

शैक्षणिक प्रतिष्ठा, संस्थेची प्रतिष्ठा, शिक्षक विद्यार्थी सरासरी, शिक्षकांची कामगिरी, परदेशी शिक्षकांची सरासरी, परदेशी विद्यार्थ्यांची सरासरी असे निकष लक्षात घेत विद्यापीठांची क्रमवारी ठरत असते. या सर्व बाबतीत आयआयटी मुंबईने आपले एक पाऊल पुढे ठेवत आपले नंबर एकचे स्थान कायम ठेवले आहे.

आयआयटी मुंबई पाठोपाठ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस, बंगळूरूने देशात दुसरा तर आयआयटी दिल्लीने तिसरा क्रमांक मिळवला आहे.

आयआयटी मद्रास आणि आयआयटी खरगपूर या क्रमवारीत मागे पडले आहेत. जागतिक क्रमवारीत ४ अंकांची घसरण होत आयआयटी मद्रास २७५ व्या स्थानी पोहचली आहे. तर गेल्या वर्षी २८१ क्रमांकावर असणारी आयआयटी खरगपूर यावेळी ३१४व्या स्थानावर आहे. तसेच गेल्या वर्षी २९१व्या क्रमांकावर असलेली आयआयटी कामपूर यंदा ३५०व्या क्रमांकावर फेकली गेली आहे. आयआयटी रुकरीने आपली ३८३ क्रमांकाची जागा कायम ठेवली आहे.

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!