पवई तलाव परिसराला नशेखोरांचा विळखा; तरुणांचे जनजागृती अभियान

@अविनाश हजारे – मुंबईतील पवई तलाव हे मुंबईकरांसाठी आकर्षणाचे ठिकाण राहिलेले आहे. या निसर्गरम्य पवई तलावाला असंख्य पर्यटक भेटी देत असतात. परंतु, पोलीस व पालिकेचा वचक नसल्याने या भागात नशेखोरांनी विळखा घातला आहे. पवई तलाव ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापर्यंतच्या परिसरात कायमच काळोखाचे साम्राज्य असल्याने नशेखोरांचे फावत असून, येथील विविध ठिकाणी गर्दुल्ले आणि दारुडे गट करून अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे निदर्शनास येत आहे. या नशेखोरांना चाप बसावा आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत या समस्येचे निराकरण करावे म्हणून पवईतील तरुणांनी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.

इंडियन सोशल मूव्हमेंट या संघटनेतर्फे ही मोहीम राबवली जात आहे. याबाबत अनेकदा पालिका व पोलिस प्रशासनाला माहिती आणि तक्रार देऊनही अद्याप यावर ठोस अशी कारवाई होऊ शकली नसल्याने संस्थतर्फे आता जनजागृतीचे हत्यार उपसण्यात आले आहे.

मुंबई आणि पवई परिसराची शान असणाऱ्या दैदिप्यमान निसर्गरम्य पवई तलाव परिसराला गर्दुल्ले आणि नशेखोरांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी इंडियन सोशल मूव्हमेंटच्यावतीने रविवारी पवई तलाव ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान मार्गावर जनजागृती रॅली काढत प्रशासनाचे लक्ष वेधले गेले.

जनजागृती रॅलीचे संयोजक व इंडियन सोशल मूव्हमेंटचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कदम यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “पवई तलाव हा परिसर मुंबईचे वैभव आहे. मुंबईसह राज्यभरातील पर्यटक येथे भेटी देत असतात. परंतु, पोलिस प्रशासन आणि पालिकेचा वचक नसल्याने गर्दुल्ले आणि नशेखोरांनी या परिसराला आपला अड्डा बनवला आहे. ज्यामुळे या दैदिप्यमान वैभवशाली परिसराला बदनामीची काळी किनार मिळाली आहे, जे अत्यंत गंभीर आहे. या गर्दुल्यांमुळे भविष्यात गंभीर गुन्ह्यांना खतपाणी मिळू शकते. जनजागृती रॅली काढत आम्ही पवई परिसर नशामुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे,”

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!