पवई तलावावर सिसिटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

वई तलाव भागात वाढणाऱ्या गैरकृत्यांना रोखण्यासाठी तसेच मुंबईकरांचे आकर्षण असणाऱ्या पवई तलावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने पवई तलावावर सिसिटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामुळे येथे चालणाऱ्या गैरकृत्यांना आळा बसेल अशी अपेक्षा पवईकरांकडून व्यक्त केली जात आहे.

पूर्वीपासूनच मुंबईकरांच्या आकर्षणाचे ठिकाण असणाऱ्या पवईतील पवई तलावाकडे जास्तीत जास्त पर्यटक आकर्षित व्हावेत, तलावाचे रुपडे पालटण्यासाठी करोडो रुपये खर्च करून येथील परिसराचे सौंदर्यकरण करण्यात आले आहे. मात्र मुंबईकरांसह मुंबई फिरायला येणाऱ्या पर्यटकांमुळे येथील गर्दी तर वाढलीच आहे सोबतच या भागात गैरकृत्यांना सुद्धा उधान आले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पवई तलावात बेकायदेशीर मासेमारी, अंधाराचा फायदा घेवून घाण आणून टाकणे, तलाव भागात कचरा पेटवणे आणि तरुणांचे अश्लील कृत्ये वाढल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून करण्यात येत आहेत. त्यातच भर म्हणून आठवडाभरापूर्वी प्रेमरसात बुडालेल्या तरुण जोडप्यांचे चित्रीकरण करून पॉर्न वेबसाईटसह सोशल मिडियाच्या माध्यमातून वायरल करण्यात आले आहे. ज्याबाबत युथ पॉवर संघटनेने दोषींवर कारवाईसह पवई तलाव भागात सिसिटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली होती.

पवई तलाव भागात वाढत्या घटनांना पाहता पालिका सुद्धा आता जागरूक झाली असून, सौंदर्यकरण प्रकल्पांतर्गत पवई तलाव भागात एलईडी दिव्यांना लावण्यात आलेच आहे, सोबतच येथील जॉगिंग ट्रॅकवर सिसिटीव्ही कॅमेरेसुद्धा बसवण्यात आले असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

एलईडी दिवे आणि सिसिटीव्ही कॅमेऱ्यांना बसवले जाण्यामुळे येथील परिसर प्रकाशमय झाल्यामुळे चालण्यासाठी येणाऱ्या लोकांना फायदा तर झालाच आहे सोबतच यामुळे परिसरात होणाऱ्या बेकायदेशीर गोष्टीना आळा बसेल असा विश्वास ही स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

, , , , , , , , , , , , ,

3 Responses to पवई तलावावर सिसिटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

  1. Amol Murudkar March 12, 2018 at 6:06 pm #

    1 Number..

  2. Amol Murudkar March 12, 2018 at 6:05 pm #

    1 Number

  3. Dattatry Yadav March 12, 2018 at 6:03 pm #

    खुप चांगल झाले आत गैरकृत होणार नाही.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!