पवई तलावाच्या मगरीचा ‘ट्रॅक वॉक’

croc apवई तलावात असणाऱ्या मगरी आतापर्यंत केवळ तलावात असणाऱ्या टेकड्यांवरच आढळून येत, मात्र सोमवारी यातील एक मगरीने तलावातून बाहेर निघत, लोकांना चालण्यासाठी बनवलेल्या पदपथावर अक्षरशः ‘ट्रॅक वॉक’ करून परत तलावात परतली. पवई तलावातील त्यांची बसण्याची ठिकाणे उध्वस्त झाल्याने मगरी आता बाहेर निघू लागल्याचे प्राणीमित्र आणि पर्यावरणवादी संस्थांचे म्हणणे आहे.

सोमवारी संध्याकाळी पवई तलाव भागात फिरत असणाऱ्या काही तरुणांना गणेशनगर गणेशघाटापासून काही अंतरावर पाच ते सहा फूट लांब मगर (मादी),

पॉज मुंबईचे सुनिष सुब्रमण्यम मगर निघालेले ठिकाण आणि मार्ग दाखवताना

पॉज मुंबईचे सुनिष सुब्रमण्यम मगर निघालेले ठिकाण आणि मार्ग दाखवताना

चालण्यासाठी बनवलेल्या पदपथावर आल्याचे आढळून आले. त्यांनी झाडाच्या फांद्या घेऊन तिला हुसकावल्यावर ती परत तलाव भागात परतली.

“पवई तलाव स्वच्छता मोहिमेच्या दरम्यान त्यातील गाळ काढून किनाऱ्यालगतच्या भागात साठवण्यात आला होता. आता तो गाळ त्या भागात पसरवून तलाव भागातून निघणाऱ्या मलबा घेऊन जाण्यास येणाऱ्या ट्रकसाठी मार्ग बनवला गेला आहे. तलावातील मगरींची बसण्याची ठिकाणे नष्ट झाल्याने मगरी या मार्गातून बाहेर निघण्यास सुरुवात झाली आहे”, असे आवर्तन पवईशी बोलताना पॉज मुंबईचे सुनिश सुब्रमण्यम यांनी सांगितले.

जल अभियंते व कार्यकारी अभियंते मात्र या गोष्टीपासून अनभिज्ञ आहेत. ‘जोरदार पावसामुळे तलावातील पावसाची पाण्याची पातळी वाढली आहे, त्यामुळे मगरींचे टिले पाण्यात जावून त्यांना बसण्यास जागा उरलेल्या नाहीत’ असे त्यांचे म्हणणे आहे.

मुख्य वनसंरक्षक के पी सिंघ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “तलावातून बाहेर निघालेल्या मगरीची छायाचित्रे आम्हास मिळाली आहेत. सहाय्यक अधिकाऱ्यांना याबाबत तपास करण्याचे आदेश दिले आहेत.”

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!