पवई तलाव परिसर उजळणार एलईडी दिव्यांनी; पर्यावरणवादी संस्थांची सौर एलईडी दिव्यांची मागणी

विदेशी पर्यटकांसह मुंबईकरांचे आकर्षण असलेला पवई तलाव परिसर येत्या काही दिवसात एलईडी दिव्याने उजळणार आहे. पवई तलाव सुशोभिकरणाच्या वेळी हे एलईडी दिवे बसवले जाणार आहेत. या कामासाठी ७.५ कोटी खर्च येणार असून, दोन कंत्राटदारांची निवड सुद्धा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे आपल्या कॅमेऱ्यात येथील दृश्यांना कैद करण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढणार आहे. मात्र, पर्यावरणवादी संस्था पॉज मुंबईने येथील एलईडी दिवे हे सौरउर्जेवर चालणारे बसवावेत अशी मागणी केली आहे.

एकेकाळी निसर्गरम्य ठिकाण म्हणून ओळख असणाऱ्या पवई तलावात शेजारी वाढत जाणाऱ्या वस्त्यांमधून निघणारे घाण, गटाराचे पाणी सोडले जात असल्याने तलावाची दुरावस्था झाली आहे. ज्यामुळे पर्यटकांनी याकडे पाठ फिरवली आहे. २००८ साली पवई तलावाचे सुशोभिकरण करण्यात आले होते. मात्र, काहीच दिवसात याची झालेली दुरावस्था पाहता पर्यावरणवादी संस्थांनी सोडले जाणारे घाण पाणी त्वरित थांबवून तलाव पुन्हा मूळ स्थितीत आणण्याची मागणी केली होती.

या परिसरात पुन्हा पर्यटक आकर्षित व्हावेत यासाठी पालिकेने उरलेल्या भागाचा सुशोभिकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. फ्रिशमन प्रभू यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. समितीने केलेल्या सर्वेनुसार केल्या जाणाऱ्या कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या अशा दोन्ही कामांची यादी तयार करण्यात आली आहे. यातील मुख्य कामात परिसरात एलईडी दिवे लावण्याचा समावेश आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच स्थायी समिती सादर करणार असल्याचे याचे अध्यक्ष यशोधर फांसे यांनी सांगितले.

याबाबत आवर्तन पवईशी बोलताना ‘पॉज मुंबई’ संस्थेचे सुनिष सुब्रमण्यम यांनी सांगितले, “गेल्या आठवड्यात सूचना व हरकती जाणून घेण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत आमची बैठक झाली आहे. तेव्हा येथे लावण्यात येणारे एलईडी दिवे हे सौरउर्जेवर चालणारे बसवावेत अशी मागणी पॉज मुंबईतर्फे केली आहे.’

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , ,

One Response to पवई तलाव परिसर उजळणार एलईडी दिव्यांनी; पर्यावरणवादी संस्थांची सौर एलईडी दिव्यांची मागणी

  1. Ajit M Patil December 22, 2016 at 6:11 pm #

    Dear administrator,

    We are dealing In all kinds of solar led, street light, flashlight

    Please guide for application for the contractor..

    Thanks,

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!