पवईत विधी शाखेच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

प्रातिनिधिक छायाचित्र

पवईतील हिरानंदानी येथे असणाऱ्या महाराष्ट्र नॅशनल लॉ-युनिवर्सिटीमध्ये विधी शाखेत शिकणाऱ्या सायली मेश्राम (२०) या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सायली लॉच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. पवई पोलिस तिच्या आत्महत्येमागच्या कारणाचा शोध घेत आहेत.

याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायली आपल्या सहकारी विद्यार्थीनीसोबत हॉस्टेलमध्ये राहत होती. बुधवारी तिची मैत्रीण वैय्यक्तिक कामानिमित्त बाहेर गेली होती. हॉस्टेलमध्ये आल्यावर तिने खोलीचा दरवाजा ठोठावल्यानंतर आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने तिने दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला. आत जाताच सायलीचा मृतदेह पंख्याला गळफास लावलेल्या स्थितीत तिला आढळला.

हॉस्टेल प्रशासनाने यासंदर्भात पवई पोलिसांना माहिती दिल्यानंतर पवई पोलिसांनी अपमृत्युची नोंद करत तपास सुरु केला आहे.

सायलीच्या मैत्रिणीने दिलेल्या जवाबानुसार, गेल्या काही दिवसांपासून ती तणावाखाली वावरत होती. मात्र घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी सापडली नसून, तिच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!