३८ लाखांच्या ‘एमडी’ अंमली पदार्थासह पवईतील एकाला अटक

atakअंमली पदार्थ विकण्यासाठी आलेल्या तीन इसमांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने टागोरनगर, विक्रोळी येथून ३८ लाखांच्या ‘एमडी’ या अंमली पदार्थासह अटक केली आहे. अटक तीन आरोपींमधील एक इसम हा पवई भागातील रहिवाशी असून, यात एका महिलेचा सुद्धा समावेश आहे. हा साठा त्यांनी कुठून आणला व कोणास विकणार होते? याचा पोलिस आता शोध घेत आहेत.

विक्रोळी येथील टागोरनगरमधील जॉली मार्ग बसथांब्याजवळ अंमली पदार्थाचा मोठा साठा घेऊन काहीजण येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटला मिळाली होती. माहितीच्या आधारे पथकाने टागोरनगर परिसरात साध्या वेशात सापळा रचला. काही वेळातच दोन इसम व एक महिला कारमधून तेथे आले. त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे १९०० ग्रॅम ‘एमडी’ अमली पदार्थांचा साठा पथकाला सापडला. पोलिसांनी अंमली पदार्थासह त्यांची कार जप्त करत त्यांना अटक केली आहे.

मोहम्मद हनिफ लोखंडवाला ऊर्फ सईद (२८), आसिफ खान (३०) आणि शहनाज सिद्दीक गलीयारा (३१) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील असिफ हा पवईचा रहिवाशी आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल वाढवणे, पोलीस निरीक्षक संतोष भालेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल काटवानी, उमेश सावंत, तानाजी खंडागळे, राजेंद्र निकम या पथकाने ही कारवाई केली.

असिफच्या अटकेमुळे पवई भागात चालणाऱ्या अंमली पदार्थाच्या व्यवसायाची माहिती पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता असल्याचे ही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत बोलताना सांगितले.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!