मास्टर आदी पुजारीने क्रीडा स्पर्धेत जिंकली दोन सुवर्णपदके

चांदिवली येथील पवार पब्लिक स्कूलमध्ये सातवीत शिकणाऱ्या मास्टर आदी पुजारी याने अलीकडेच विद्यापीठ क्रीडा मैदान, मरीनलाइन्स येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेत शाळेचे प्रतिनिधित्व करत १०० मीटर शर्यत आणि ४ x १०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक जिंकले.

आदी ब्रह्मा बैदरकला पंच धूमवती गारोडी सेवा ट्रस्ट मुंबईचे सक्रिय सदस्य रवी पुजारी आणि संध्या पुजारी इन्नांजे यांचा मुलगा आहे. ट्रस्टचे अध्यक्ष नित्यानंद डी कोटियन, बिल्लावरा सेवा संघ संथेकट्टे अध्यक्ष जयसी शेखर गुज्जराबेट्टू आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी त्याच्या या यशाबद्दल त्याचे अभिनंदन केले.

पवार पब्लिक स्कूल शिक्षकवर्ग यांच्यासह मित्रमंडळी आणि नातेवाईक यांच्याकडून त्याच्यावर त्याच्या या कामगिरीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

, , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!