युथ पॉवरच्या पॉकेट दिनदर्शिकेचे नाका कामगारांच्या हस्ते अनावरण

युथ पॉवर संघटनेतर्फे प्रत्येकवर्षी बनावण्यात येणारया ‘युथ पावर पॉकेट दिनदर्शिके’चे अनावरण नुकतेच पार पडले. या वर्षीच्या या पॉकेट दिनदर्शिकेचे अनावरण पवईतील नाका कामगारांच्या हस्ते करण्यात आले. प्रत्येक पवईकराच्या खिशात आपली दिनदर्शिका हवी म्हणून सध्या याचे सर्वत्र वाटप करण्यात येत आहे. यावेळी संघटनेचे रमेश कांबळे, विलास ताकतोडे, सचिन व्होरा, राकेश गुप्ता, अन्नवर शेख आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

“या दिनदर्शिकेचे वैशिष्ट्ये म्हणजे दिनदर्शिकेमध्ये भारतीय संविधानाची प्रस्तावना देण्यात आली असून, मुंबईतील अत्यावश्यक संपर्क क्रमांक यामध्ये उपलब्ध आहेत. ही दिनदर्शिका सहजपणे प्रत्येकजण आपल्या खिशात ठेवू शकतो, त्यामुळे दिनदर्शिका नक्कीच उपयुक्त ठरेल”, असे यावेळी बोलताना संघटनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष विरेंद्र धिवार यांनी सांगितले.

हे पॉकेट कँलेंडरचे संघटनेतर्फे समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, पञकार, पोलिस, लेखक, डॉक्टर, समाजसेवक, उद्योजक यांच्या सोबतच सर्वसामान्य नागरिकांमध्ये वाटप करण्यात आले. तसेच दिनदर्शिकेचे उदघाटन नाका कामगारांच्या हस्ते करत समाजात एक आदर्श उभा केला आहे.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!