व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या सराईत भामट्याला अटक

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबईतील विविध व्यापाऱ्यांची फसवणूक करून लाखो रुपयांसह त्यांचा मालाचीही लूट करणाऱ्या सराईत भामट्याला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रदीप अगरवाल उर्फ प्रेमप्रकाश उर्फ राजू जगदीश मखिजा (३८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मुंबईतील धोबी तलाव भागात राहणारे नरेंद्र तारी यांची सावंतवाडी येथे काजूची बाग आहे. सदर बागेत येणाऱ्या काजूची विक्री करण्यासाठी त्यांचा मुलगा करुणेश याने सोशल माध्यमातून जाहिरात केली होती. प्रदीप अगरवाल नामक इसमाने याबाबत चौकशी करून ३२० किलो काजू अल्पालाईन इंडस्ट्रीज, मरोळ येथील गाळ्यावर मागवले.

प्रदीप याने मागणी केलेले काजू आणण्यासाठी तारी यांच्या घरी एक कार सुद्धा पाठवली. करुणेश मागणी केलेले काजू घेवून दिलेल्या पत्त्यावर पोहचला असता प्रदीप याने मी घरी गेलो आहे. तेथील सुरक्षारक्षकाच्या केबिनमध्ये काजूच्या बॅग ठेवण्यास सांगितले.

“दुसऱ्या दिवशी करुणेश याने पुन्हा तिथे जावून चौकशी केली असता सुरक्षारक्षक याने काही वेळातच एक इसमाने येवून सदर बॅग नेल्याची माहिती दिली. त्यानंतर करुणेश याने प्रदीप याला फोन लावला असता तो बंद असल्याचे समोर आले. सतत संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच त्यांनी पवई पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

प्रदीप उर्फ प्रेमप्रकाश उर्फ राजू

“गुन्ह्याच्या तांत्रिक तपासात पाहिजे आरोपी प्रदीप अगरवाल याचे खरे नाव प्रेमप्रकाश जगदीश मखिजा असे असून, तो सात बंगला, वर्सोवा येथे राहत असल्याचे निष्पन्न झाले होते,” असे याबाबत बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक लालासाहेब डाके यांनी सांगितले.

आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पवई पोलीस पथक त्याच्या घरी पोहचले असता, एमआयडीसी पोलिसांनी त्याला अशाच एका गुन्ह्यात अटक केली असल्याचे समोर आले. न्यायालयातून त्याचा ताबा मिळवून चौकशी केली असता त्याने खार येथील एका व्यापाऱ्याला त्याची विक्री केली असल्याचे सांगितले, असे पवई पोलिसांनी सांगितले.

काजू विक्रीतून मिळवलेली १,५०,००० रुपये रक्कम पवई पोलिसांनी सदर व्यापाऱ्याकडून प्रोडक्शन पंचनामा अंतर्गत हस्तगत केली आहे.

“अटक आरोपी प्रदीप अगरवाल उर्फ प्रेमप्रकाश उर्फ राजू जगदीश मखिजा हा सराईत गुन्हेगार असून, व्यापारी आणि व्यावसायिकांची फसवणूक केल्याचे अशाप्रकारचे पवईसह डोंगरी, जुहू, एमआयडीसी, मलबार हिल, डी बी मार्ग, एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात ७ गुन्ह्यांची नोंद आहे,” असेही यासंदर्भात बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!