आयआयटी पवई येथे मोटारसायकल चालकाला उडवले; डॉक्टरला अटक

आयआयटी पवई येथे मोटारसायकल चालकाला उडवले; डॉक्टरला अटक | #powai #accident #motorcyclist #arresteddoctor #news #powainews

रविवारी सकाळी आयआयटी-पवई सिग्नलजवळ एका मोटारसायकल चालकाला धडक देत हयगयने गाडी चालवत त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या एका २४ वर्षीय डॉक्टरला पवई पोलिसांनी अटक केली आहे. सिद्धार्थ सत्येंद्र चौधरी असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे.

मुलुंडच्या गव्हाणपाडा येथील रहिवासी असणारे सचिन पुतळाजी भोसले (२९) हे या अपघातात मृत पावले आहेत.

पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटेच्या सुमारास जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर (जेव्हीएलआर) आयआयटी पवई सिग्नलजवळ हा अपघात घडला. भोसले हे व्यवसायाने चालक होते आणि अत्यंत गंभीर स्थितीत असलेल्या आपल्या मावशीला पाहण्यासाठी विलेपार्ले येथे जात होते. “रस्त्यावरून क्रॉस होत असताना जेव्हीएलआरवर येताना विरूद्ध दिशेने आलेल्या चौधरी यांच्या कारने मोटारसायकलला धडक दिल्याने भोसले गंभीर रित्या जखमी झाले होते,” असे याबाबत बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले.

“एका खाजगी रुग्णालयात काम करणारे डॉक्टर नुकतीच रात्रीची शिफ्ट संपवून आपल्या घरी जात होते. अपघातानंतर भोसले यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले जेथे त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले,” असे याबाबत बोलताना पवई पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (प्रभारी वपोनि) विजय दळवी म्हणाले.

पोलिसांनी डॉक्टर चौधरी यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करत डॉक्टरला अटक करून न्यायालयात हजर केले. जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली आहे.

 

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.

#powai #accident #motorcyclist #arresteddoctor #news #powainews

, , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!