वृद्धेला पोलीस असल्याचे सांगून २ लाखाचे सोन्याचे दागिने लांबवणारया भामट्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात आपल्या मुलीच्या उपचारासाठी आलेल्या एका ६२ वर्षीय वृद्ध महिलेला पोलीस असल्याची बतावणी करून, २ लाखाचे दागिने लांबवणाऱ्या चोरट्याला अडीच महिन्यानंतर अखेर पोलिसांनी मालवणी येथून अटक केली आहे.

गुलझार अली (३१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो मालवणी येथे इस्टेट एजंटचे काम करतो.

पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधा गौंडर (६२) यांच्या मुलीची तब्येत ठीक नसल्याने त्यांना पाठीमागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

१० नोव्हेंबरला सकाळी आपल्या मुलीला रुग्णालयात भेटल्यानंतर गौंडर चालत परतत असताना स्वामीनारायण चौकाजवळ दोन इसम त्यांना भेटले. आम्ही पोलीस आहोत, पुढे पोलीस तपासणी करत आहेत तुमचे दागिने काढून ठेवा. असे बोलत त्यांनी त्यांच्याजवळील दागिने एका रुमालात बांधून देवून त्यांना घरी जाण्यास सांगितले. असे पोलीस सूत्रांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.

घरी जावून गौंडर यांनी दागिने तपासण्यासाठी रुमाल उघडून पाहिला असता ते त्यात नव्हते. मोठ्या चलाखीने भेटलेल्या तरुणांनी आपल्या दागिन्यावर हात साफ केले असल्याचे लक्षात येताच त्यांनी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

‘आरोपींनी तक्रारदार महिलेशी बोलताना तिची मातृभाषा लक्षात येताच कन्नड भाषेत बोलण्यास सुरुवात केल्याने तिचा आरोपींवर विश्वास बसला आणि तिने आपले सर्व दागिने काढून त्यांच्या जवळ बांधून देण्यास दिले’ असे याबाबत बोलताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

आरोपी गुलजार अली याला आम्ही अटक केली असून, सदर गुन्ह्यात असणाऱ्या त्याच्या साथीदाराचा आम्ही शोध घेत आहोत असेही याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्याने सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!