चोरीच्या गुन्ह्यात थेरपीस्टला अटक

पचाराच्या नावावर चोरी करणाऱ्या एका थेरपिस्टला पवई पोलिसांनी अटक केली आहे. रवी चौरसिया (२९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. घरात चोरी करताना रंगेहाथ पकडून त्याला पवई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

पवईतील रहिवाशी असणाऱ्या प्रियांका मारडा यांच्या घरात चोरीचे प्रकार घडत होते. त्यांच्या घरातून डायमंड पेंडंटसह सोन्याची चैन आणि एक किंमती घड्याळ असे चार लाखाचे किंमती ऐवज गायब झाले होते. याबाबत घरात उपचारासाठी येणाऱ्या थेरपिस्टवर त्यांना शंका असल्याने त्यांनी सापळा रचून घरात चोरी करताना त्याला रंगेहाथ पकडले.

‘मारडा यांच्या घरी असणाऱ्या त्यांच्या आईच्या न्यूरोथेरपीच्या उपचारासाठी रवी गेल्या जवळपास अडीच वर्षापासून आठवड्यातून पाच वेळा येत होता. त्यांच्या घरातून जवळपास चार लाखाचा ऐवज चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतःच त्या चोराला पकडण्याचा डाव आखला’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्याने सांगितले.

ते पुढे म्हणाले की, ‘चोराला पकडण्यासाठी जिथे उपचार केला जातो त्या रूममध्ये मारडा यांनी पैशाने भरलेले पाकीट ठेवले होते. त्या पाकिटातून पैसे चोरी करताना रविला रंगेहाथ पकडून त्यांनी पवई पोलिसांच्या स्वाधीन केले.’

पवई पोलिसांनी चौकशीअंती भादवि कलम ३८० (चोरी) नुसार गुन्हा नोंद करून रविला अटक केली असून, त्याच्याकडे अधिक चौकशी करत आहेत.

, , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!