विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या ट्युशन शिक्षकाला अटक

घरी पोचल्यावर मुलीने तिच्या आईला घडला प्रसंग सांगितल्यानंतर दोघींनी पवई पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला.

प्रातिनिधिक छायाचित्र

ट्युशन क्लासमध्ये शिकणाऱ्या एका १३ वर्षाच्या मुलीला केबिनमध्ये बोलावून तिच्याशी लैंगिक संबंधाबाबत बोलत अश्लील वागणूक दिल्याप्रकरणी पवई पोलिसांनी गुरुवारी एका ४२ वर्षांच्या ट्युशन शिक्षकाला प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ओफेंस (पोक्सो) कायद्यांतर्गत अटक केली आहे. सचिन गुलाब हांडे असे या शिक्षकाचे नाव आहे.

घरी पोहचल्यावर मुलीने तिच्या आईकडे घडला प्रकार सांगितल्यानंतर दोघींनी पवई पोलिस ठाण्यात येवून याबाबत गुन्हा दाखल केला आहे. पोक्सो कायद्यान्वये कलम ३५४ अ (लैंगिक छळ) आणि १२ (लहान मुलांचा लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी पवई हिरानंदानी जवळ असणाऱ्या एका चाळीत राहते. ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ती ट्युशनसाठी गेली असताना तेथील शिक्षकाने तिला आपल्या केबिनमध्ये येण्यास सांगितले. यावेळी त्याने लैंगिक सुखाबद्दल तिच्याशी बोलत अश्लील वर्तणूक केली. विद्यार्थिनीने याबाबत प्रतिसाद देण्याचे टाळत शांतपणे घरी येवून आपल्या आईला घडला सगळा प्रकार सांगितला.

पवई पोलिसांनी गुन्ह्याची गंभीरता पाहता त्वरित कारवाई करत आरोपी ट्युशन शिक्षकाला अटक केली आहे.

पवई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी यावेळी बोलताना म्हणाले, ‘आम्ही आरोपीला सत्र न्यायालयात हजर केले असता, त्याला पोलिस कोठडी देण्यात आली आहे.’

आरोपी इतर विद्यार्थिनींवर सुद्धा टिप्पण्या करत असे मात्र याबाबत अजून कोणीही तक्रार केलेली नाही. याबाबत सुद्धा पवई पोलिस अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes