पॉर्न साईटवर पूर्व प्रेमिकेचा अश्लील व्हिडीओ टाकणाऱ्या प्रेमीला अटक

दोघे पाठीमागील काही वर्षांपासूनच्या नातेसंबंधात होते. दोघे एकमेकांना व्हिडिओ कॉल करत. अशा एका व्हिडिओ कॉल दरम्यान आरोपी प्रेमीने सदर व्हिडिओ रेकॉर्ड केला होता.

आपल्या पूर्व प्रेमिकाचा अश्लील व्हिडीओ पॉर्न वेबसाईटवर पोस्ट करणाऱ्या इलेकट्रीकल इंजिनिअरला पवई पोलिसांनी अटक केली आहे. प्रेमिकेशी ब्रेकअप नंतर तरुणाने पॉर्न वेबसाईटवर हा व्हिडीओ अपलोड केला होता. तरुणीच्या लक्षात येताच तिने पवई पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर पवई पोलिसांनी आरोपी तरुणाला पवई येथील त्याच्या घरातून अटक केली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणीला माहिती नव्हते की आरोपी त्यांचा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करीत आहे. अलीकडेच, वारंवार दोघांच्यात होणाऱ्या वादविवादानंतर दोघांनी नाते संपुष्टात आणले होते. तक्रारदार तरुणीच्या मैत्रिणीने याबाबत माहिती देईपर्यंत पॉर्न साईटवर व्हिडिओ अपलोड झाला असल्याबद्दल तिला माहिती नव्हती. तरुणीने व्हिडीओ पाहिल्यानंतर तिच्या पूर्व प्रेमीशी व्हाट्सएप व्हिडिओ कॉल केला होता त्यावेळी तो व्हिडीओ रेकॉर्ड झाला असल्याचे लक्षात आले. याबाबत तिने पूर्व प्रेमीला विचारणा केली असता त्याने असा कोणताही व्हिडीओ अपलोड केला असल्यास नकार दिला.

‘पीडित तरुणीने १५ जानेवारीला आमच्याकडे येऊन याबाबत तक्रार केल्यानंतर भादंवि कलम आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्यानुसार आम्ही तक्रार दाखल केली होती’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी सांगितले.

तक्रारीत पीडिताने ती तिच्या पूर्व प्रेमीशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधत असल्याचे सांगतानाच त्यापैकी एक व्हिडिओ पॉर्न वेबसाइटवर अपलोड करण्यात आला असल्याचे पोलीस जवाबात सांगत पूर्व प्रेमीवर संशय दर्शवला होता. ज्याच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरु केला होता.

तांत्रिक पुराव्याच्या आधारावर पवई पोलिसांनी बुधवारी आरोपी तरुणाला पवई येथील त्याच्या घरातून अटक केली आहे.

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes