अट्टल रिक्षा चोराला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पवईसह मुंबई परिसरात रिक्षा चोरी करणाऱ्या अट्टल चोराला पवई पोलिसांनी रविवारी बेड्या ठोकल्या आहेत. शांताराम अशोक धोत्रे (३१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. धोत्रे याच्या विरोधात मुंबईत अशाच प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद असून, १५ दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून आला होता.

यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरज पंडित हे भाडेतत्वावर रिक्षा चालवतात. त्यांच्या ताब्यातील चालवण्यासाठी घेतलेली रिक्षा (क्रमांक एमएच ०२ डीयू १८४७) त्यांनी १५ ऑक्टोबर रोजी संध्याकळी १० वाजण्याच्या सुमारास परत आल्यावर बामनदाय पाडा येथील आपल्या राहत्या परिसरात उभी केली होती.

सकाळी मी पुन्हा कामावर जाण्यासाठी रिक्षा पार्क केलेल्या ठिकाणी पोहचलो तेव्हा रिक्षा मी पार्क केलेल्या ठिकाणी नव्हती. आसपासच्या परिसरात शोध घेतला असता सदर रिक्षा मिळून आली नाही. त्यामुळे ती कोणीतरी चोरी केल्याची खात्री पटल्यामुळे मी पोलीस ठाण्यास तक्रार नोद करत आहे, असे पोलिसांना दिलेल्या जवाबात पंडित याने म्हटले आहे.

“तपासादरम्यान अभिलेखावरील गुन्हेगार शांताराम धोत्रे याला परिसरात फिरताना पाहिल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने त्याची माहिती मिळवत त्याला मिलिंदनगर जवळील परिसरातून ताब्यात घेण्यात आले, असे याबाबत बोलताना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि विनोद पाटील यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून चोरी केलेली ऑटो रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे.”

सदर गुन्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विनोद पाटील आणि गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी उघडकीस आणला.

, , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!