प्रशांत शर्मा यांना राज्यपालांच्या हस्ते ‘एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड्स’

अनेक संस्थांचे विश्वस्त आणि प्रख्यात बांधकाम व्यावसायिक प्रशांत शर्मा यांना शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित ‘एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड्स २०२२’ प्रदान करण्यात आला आहे. ३ सप्टेंबरला राजभवन मुंबई येथे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

प्रशांत शर्मा यांना हा पुरस्कार त्यांच्याद्वारे चालवल्या जाणार्‍या अनेक संस्थांचे विश्वस्त या नात्याने शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या अग्रेसर योगदानासाठी देण्यात आला आहे. शर्मा पवईतील गोपाल शर्मा मेमोरियल स्कूल (GSM), पवई इंग्लिश हायस्कूल आणि चंद्रभान शर्मा महाविद्यालय संस्थांचे विश्वस्त आहेत.

‘एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड्स राज्यातील सर्वोच्च शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांना दिला जातो. राज्यातील शिक्षणतज्ञांच्या योगदानाचे कौतुक आणि सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.

प्रशांत शर्मा यांच्यासोबतच फादर अब्राहम जोसेफ, अ‍ॅलिस बरेटो, एमी बिलिमोरिया, अनिलकुमार बी, आर्मेटी इंजिनियर, बेनेफर कुतार, दीपशिखा श्रीवास्तव यांच्यासह ४८ संस्थांच्या प्रमुखांचा सत्कार करण्यात आला.

, , , , , , , , , , , , , , ,

Comments are closed.

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!
%d bloggers like this: