नागरी समस्या समजून घेण्यासाठी आमदारांचा रहिवाशांसोबत संवाद

विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार दिलीप भाऊसाहेब लांडे यांनी शनिवारी सकाळी मुंबई पोलिस, पालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत हिरानंदानी पवई येथील फॉरेस्ट क्लब येथे आपल्या मतदार संघातील रहिवाशांसोबत संवाद साधला. परिसरातील समस्या समजून घेण्यासह हिरानंदानी येथील दैनंदिन जीवनावर रहिवाशांच्या दृष्टीकोनातून होणार्‍या सर्वसाधारण नागरी तक्रारी समजून घेण्यासाठी संवादाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आमदार दिलीप लांडे सहाय्यक पोलीस आयुक्त (साकीनाका विभाग) मिलिंद खेतले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे (पवई पोलीस ठाणे), वरिष्ठ पोलीस निरीक्षक सकपाळ (साकीनाका वाहतूक विभाग), पालिका ‘एस’ विभाग सहाय्यक आयुक्त संतोष कुमार धोंडे उपस्थित होते.

यावेळी नागरिकांनी सहाय्यक पोलिस आयुक्त मिलिंद खेतले आणि उपस्थित इतर अधिकारी यांच्यासमोर आपल्या समस्या मांडताना वाहतूक कोंडी, रहदारीची दयनीय स्थिती, महाविद्यालयीन किशोरवयीन तरुणांकडून येथील रस्त्यांवर होणाऱ्या दुचाकीवरील स्टंट, असामाजिक घटक, ड्रग पेडलर्स आणि वापरकर्त्यांमधील वाढ अशा कायदा सुव्यवस्थेशी निगडीत समस्या मांडल्या. तर पालिका अधिकारी यांना ठिकठिकाणी कोणतीही पूर्वसूचना न देता अनियोजित रस्ते खोदून काम सुरु करणे, वाहतूक व्यवस्थेत अडथळे निर्माण करणे अशा समस्या निर्माण होत असल्याची तक्रार केली.

यावेळी नागरिकांशी संवाद साधताना लांडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या समस्यांवर त्वरित काम सुरु करण्याचे आदेश देतानाच पुढील पाच वर्षे आपल्या मतदारसंघासाठी असणाऱ्या आपल्या दृष्टिकोनाबद्दल माहिती दिली. नागरिकांनी आपल्यासमोर ठेवलेल्या मागण्यांची त्वरित पूर्तता करण्याचे आश्वासन सुद्धा आमदारांनी यावेळी दिले. नागरिकांशी चर्चा करताना अतिक्रमण आणि कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्दय़ावरील तीन सूचनांवर त्वरित काम सुरु करणार असल्याचे बोलतानाच नागरिकांच्या जास्तीत जास्त समस्या सोडवण्याचा आपला मानस असल्याचे सांगितले. नागरिकांच्या सूचना आपल्या पुढील पाच वर्षाच्या काळात या परिसराच्या विकासासाठी नक्कीच मार्गदर्शक असून, त्या मांडल्याबद्दल त्यांनी नागरिकांचे आभार सुद्धा मानले.

नागरिक, निवडलेले प्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यात झालेली ही चर्चा खरोखरच योग्य दिशेने झाली असल्याची एकमताने सहमती दर्शवतानाच समस्यांचे निवारण करतानाच भविष्यात अशा अनेक संवादांचे आयोजन करण्याचेही यावेळी नक्की करत याची सांगता करण्यात आली.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!