पवईकर दांपत्याची बीएमडब्ल्यूने विश्वसफर

@pracha2005

छायाचित्र: @saurabhistic

छायाचित्र: @saurabhistic

वईकर जेनेट (५५) आणि लुईस (६१) डिसोझा यांना दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून काहीतरी वेगळे चित्तथरारक करण्याची इच्छा होती. त्यातूनच वेगळा प्रयोग करण्याचे ठरवले गेले आणि हे जोडपे २० मे पासून आपल्या बीएमडब्ल्यू गाडीने ४० पेक्षा अधिक देशाच्या विश्वसफरीसाठी निघाले आहे. जवळपास ६ ते ७ महिन्याच्या प्रवासात ५० हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतराची त्यांची ही सफर आहे. या प्रवासात सामाजिक कार्य करत दोन स्वयंसेवी संस्थानाही मदत करण्याचा डिसोझा दांपत्याचा मानस आहे.

पवईतील हिरानंदानीमध्ये राहणाऱ्या जेनेट आणि लुईस या जोडप्यांचा माल वाहतुकीचा व्यवसाय असून, त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. दोन्ही मुले आता आपआपल्या जगात सुखी असल्याने जोडप्याला आयुष्यातले एकमेकांच्या सोबतचे हरवलेले क्षण पुन्हा जगायचे आहेत. शहरातील धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडून काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असतानाच, फेसबुक या सोशल नेटवर्किग साईटवर बँगलोर येथील एका परिवाराच्या पॅरिस रोड सफरबाबत त्यांच्या वाचनात आले. त्यांनी सुद्धा असेच काहीतरी करायचे ठरवले आणि नियोजनाला सुरवात झाली.

“१९७८ साली प्रथम भेटल्यावर १९८२ साली आम्ही लग्न केले. धकाधकीच्या आयुष्यात एकमेकाच्या सोबतीचे अनेक क्षण जगायचे राहून गेलेत. आम्हाला एकमेकांना पुन्हा जाणून घ्यायचे आहे. तेही अशा मार्गांवरून ज्या मार्गांवरून अजून कोणीही प्रवास केला नसेल, जे खरच सुंदर आहे. तसे देशाच्या दक्षिण भागात आम्ही बराच प्रवास केला आहे, मात्र काही अफवांमुळे उत्तरेकडे जाणे जमले नाही पण शेवटी चंग बांधून आम्ही आमच्या बीएमडब्ल्यू कारने प्रवास करण्याचे नक्की केले. आम्हाला विविध लोकांना आणि संस्कृतींना जाणून घेण्याची ओढ लागून राहिली आहे” असे डिसोजा दांपत्य म्हणाले.

जीवनातील पुस्तकाची अनेक नवनवीन पाने उलघडत असतनाच व्हाईट डव्ह आणि मुस्कान या दोन स्वयंसेवी संस्थाना मदत करण्याचा सुद्धा या दांपत्यांच्या मानस आहे.

पवईतून निघालेले हे जोडपे म्यानमार, चीन, तिबेट, कझाकीस्थान, रशिया, लटाविया, एस्टोनिया, फिनलॅंड, नॉर्वे, स्वीडेन, डेन्मार्क, जर्मनी, नेदरलॅंड व बेलजिअम मार्गे लंडनला पोहचतील. तर परतीत ते फ्रांस, स्पेन, पोर्तुगल, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, सोल्वेनिया, पोलंड, सोल्वाकिया, हंग्री, इटली, ग्रीस, रोमानिया, तुर्की, जोर्गिया, इराण, उझबेकिस्तान, तिबेट, नेपाल मार्गे पवईला परतणार आहेत.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!