पवई सिनिअर सिटीझन असोसिएशनतर्फे बालवाडीच्या मुलांना शालेय वस्तूंचे वाटप

पवई सिनिअर सिटीझन असोसिएशनतर्फे गुरुवारी, २० सप्टेंबर २०१९ रोजी पवईमधील तिरंदाज शाळेच्या ३ बालवाडीतील सर्व मुलांना गणवेश, शाळेची बग, लंच बॉक्स आणि पाण्याच्या बाटलीचे वाटप करण्यात आले. भाजपा नगरसेविका वैशाली पाटील यांनी पवई सिनिअर सिटीझन असोसिएशनच्या कार्याचे कौतुक केले.

आयआयटी जवळील तिरंदाज येथील पालिका शाळेतील तीन बालवाडी पवई सिनिअर सिटीझन असोसिएशनने दत्तक घेतल्या आहेत. दरवर्षी एकूण ६० ते ८० विद्यार्थ्यांना गणवेश बग, पाण्याच्या बाटल्या आणि अभ्यासाची सामग्री दिली जाते. दररोज मुलांना फळे दिली जातात. यासाठी वार्षिक ८ लाख रुपये असोसिएशनतर्फे खर्च केले जातात. यावेळी बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी कविता आणि नृत्य सादर करत या कार्यक्रमात रंगत आणली.

पवई सिनिअर सिटीझन असोसिएशनच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेविका वैशाली पाटील यांच्या हस्ते झाले. हिरानंदानी गार्डन येथील रहिवाशी प्रेम वच्चानी, अशोक कुमार, श्रीकांत साळी, एम.व्ही. कामत, मनोहर पर्यानी, पुष्पा बजाज, निर्मला चोणकर, अमिता मेहता, रचना जैन, चांद, रविदत्त शर्मा आणि कीर्ति मेहता यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

बालवाडी ही मराठी माध्यमातून चालणारी पूर्व प्राथमिक शाळा असते, सरकार किंवा स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही चालविली जाते. अशा प्रकारची शाळा स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या साहित्यातून शक्य तितक्याच शैक्षणिक साहित्यांचा वापर करते. १९४५ साली महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील किनारपट्टी गावात बोर्डी येथे नूतन बाल शिक्षण संघातर्फे प्रथम बालवाडी सुरू करण्यात आली होती, ज्याचे निर्माण ताराबाई मोडक यांनी केले होते.

मोडक यांनी मध्यवर्ती बालवाडी आणि अंगण बालवाडी (किंवा अंगणवाडी) अशा दोन प्रकारच्या बालवाडीचे निर्माण केले होते. सेंट्रल बालवाडी नियमित शाळेय वेळेत अनेक ठिकाणांच्या मध्यभागी कार्यरत असतात. तर अंगण बालवाडी मुलांच्या राहण्याच्या शेजारच्या भागात त्यांच्या सोयीनुसार काही तास चालतात.

शाळेत आणि घरात मुलांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीचा उद्देश समोर ठेवून बालवाड्यांची निर्मिती झाली. सरकारी आणि अशासकीय एजन्सींनी हजारो बालवाडी संपूर्ण भारतभर उभारल्या आहेत. बालवाडीस शिक्षणाच्या आधुनिकीकरणाद्वारे भारत सरकारच्या दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सुद्धा विकसित केले गेले. भारताच्या ग्रामीण गरीब मुलांसाठी हे विकसित करण्यात आले होते. बालवाडी न्यूट्रिशन प्रोग्राम अंतर्गत या शाळांमध्ये मुलांसाठी भोजन पुरवले जाते.

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!