पवईत शिवसेना प्रणित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

@अविनाश हजारे | महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानुसार विक्रोळी विभागांतर्गत झालेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला.

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसादपवईतील आयआयटी मेनगेट येथील पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये आमदार सुनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा क्रमांक १२२च्यावतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये शिवसेना पुरस्कृत अनेक मंडळे, संस्थांच्या कार्यकर्त्यांसह शिवसैनिकांनी समाजाप्रती असलेली आपली कृतज्ञता आणि जबाबदारी ओळखून पुढे येऊन रक्तदान केले.

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसादयावेळी शिबिरात २११ रक्तदात्यांनी रक्तदान करत १००० बॉटल्सचा रक्तदानाचा हा संकल्प पूर्णत्वास नेला. तब्बल १३७१ बॉटल्स रक्त यावेळी जमा झाले असल्याची माहिती शाखा १२२चे शाखाप्रमुख सचिन मदने यांनी दिली.

उपक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व पदाधिकारी उपशाखाप्रमुख, गटप्रमुख महिला- पुरुष आणि रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचे यावेळी शाखेतर्फे आभार मानले आहेत.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा.

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!