जेकेडी राष्ट्रीय स्पर्धेत एसएमशेट्टीच्या विद्यार्थ्यांना चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्सचा किताब

मुंबईतील अंधेरी स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे पार पडलेल्या चिताह राष्ट्रीय जेकेडी स्पर्धेत पवईतील एस एम शेट्टी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यानी प्रथम नंबर पटकावत चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्सचा किताब आपल्या नावे केला आहे.

मार्शल आर्ट प्रकारातील ‘जित कुन डो’ (जेकेडी) कला प्रकारचे देशभरात विविध स्पर्धेंचे आयोजन केले जाते. प्रत्येक वर्षी याचाच भाग असणारी चिताह राष्ट्रीय जेकेडी स्पर्धा मुंबईत आयोजित केली जाते. यावर्षी मुंबईच्या अंधेरी स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे पार पडलेल्या ९व्या चिताह राष्ट्रीय जेकेडी स्पर्धेत पवईतील एस एम शेट्टी इंटरनॅशनल स्कूलच्या विविध गटातील विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करत प्रथम स्थान मिळवले आहे.

भारतातील २१ राज्याच्या हजारो स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. यात महाराष्ट्रातील २० शाळांनी सहभाग नोंदवला होता. या सर्वांमध्ये झालेल्या स्पर्धेत एस एम शेट्टी शाळेने आपले कसब दाखवत १४ गोल्ड (सुवर्ण) १३ सिल्वर (रौप्य) आणि ४ ब्रॉंझ (कांस्य) पदकांवर आपले नाव कोरले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्सचा किताब सुद्धा आपल्या नावे केला आहे.

विद्यार्थ्यांना सेलिब्रिटी ट्रेनर चिताह यग्नेश शेट्टी आणि शाळेचे प्रशिक्षक सुनील लिंगारे यांचे मार्गदर्शन लाभले.

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!