दहावी परीक्षेत पवईच्या विद्यार्थ्यांची भरारी

@प्रमोद चव्हाण

वईतील अनेक विद्यार्थी शैक्षणिक करिअरच्या स्तरावर पदार्पण करत आहेत. मार्चमध्ये झालेल्या एसएससी (दहावी) परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात बऱ्याच विद्यार्थ्यांनी ९७% पेक्षा अधिक गुण मिळवून त्यांचे कुटुंब आणि शाळा दोघांना गौरव मिळवून दिला आहे. आम्ही पवईंच्या शाळांमधील समृद्ध मिश्रणाचा थोडक्यात घेतलेला आढावा.

एस एम शेट्टी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय

असे म्हटले जाते की “स्वप्न म्हणजे जादूच्या माध्यमातील वास्तव नाही; ते पूर्ण करण्यासाठी निर्धार आणि कठोर परिश्रम लागते.” बंट्स संघाच्या पवईतील एस एम शेट्टी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी एसएससी बोर्डाच्या परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवत हा सिद्धान्त सिद्ध केला आहे. सलग सोळाव्या वर्षी १००% निकाल या शाळेच्या निश्चल निर्धार आणि कठोर परिश्रमांचे सूचक आहेत.

आदिती प्रकाश ९७.४%, आदित्य वर्मा ९७% आणि सिद्धी गोथिव्हरेकरने ९६.६% गुण मिळवत शाळेत अनुक्रमे एक, दोन आणि तीन क्रमांकाचे स्थान पटकावले आहे.

एकूण १८२ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते, ज्यापैकी २७ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक मार्कांनी १४१ विद्यार्थी सर्वोत्तम श्रेणीत ३८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि ३ विद्यार्थी दुसऱ्या श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. “आम्ही आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या सिद्धांताने प्रभावित झालो आहोत. आम्हाला अभिमानी बनवणाऱ्या या विद्यार्थ्यांचा आम्हाला अभिमान वाटतो” असे शाळा प्रशासनाने सांगितले.

गोपाल शर्मा मेमोरियल स्कूल

पवई विहार येथील गोपाल शर्मा मेमोरियल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी २०१७ – १८ एसएससी बोर्डाच्या परीक्षेत पुन्हा एकदा उत्कृष्ट यश संपादन केले आहे. शाळेचा १०० टक्के निकाल लागला असून, दिशा पटेलने ९५.२० टक्के गुण मिळवून विद्यार्थ्यांच्यात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. पाठोपाठ भाव्य कोठारीने ९५ टक्के गुण मिळवून दुसरे तर स्टेफि जॉर्जने ९४.६ टक्के गुण मिळवत तिसरे स्थान पटकावले आहे.

केतन जैन आणि सना शेख (९४.२०%), जेवीन पटेल (९४%) हे अन्य काही उच्चांकी विद्यार्थी. एकूण १०१ विद्यार्थ्यांमधील २० विद्यार्थ्यांना ९० टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. ३१ विद्यार्थ्यांना ८० टक्केपेक्षा अधिक, तर ३६ विद्यार्थ्यांनी ७० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.

पवई इंग्लिश हायस्कूल

सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे आधारवड म्हणून ओळख असणाऱ्या पवई इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी एसएससी बोर्डाच्या परीक्षेत १०० टक्के निकाल लावत या स्पर्धात्मक युगात आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. सौरभ चौगूले याने ९४% गुण मिळवून शाळेत अव्वल स्थान मिळविले, तर साक्षी मांजरेकर ९३.८ टक्के गुण आणि प्रबोध जाधव ९२.८०% गुण मिळवून अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले आहे. तर पाठोपाठ ९६.६० टक्के गुण मिळवत नंदीनी मिश्राने चौथे स्थान पटकावले. एकूण १७० विद्यार्थ्यांपैकी ६१ विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम श्रेणी, ८१ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, २५ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तर ०३ विद्यार्थ्यांनी पास श्रेणी मिळवली आहे. शाळेचे विश्वस्त प्रशांत शर्मा यांनी उत्तीर्ण विद्यार्थी आणि कर्मचारी यांचे अभिनंदन केले. प्रिन्सिपल शर्ली उदयकुमार यांनी विद्यार्थ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांच्या कष्टांची प्रशंसा केली.

आशा मुंबई

गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हात देणाऱ्या आशा मुंबई स्वयंसेवी संस्थेच्या एसएससी विद्यार्थ्यांच्या निकालांची घोषणा करताना ते अत्यंत अभिमानास्पद आणि उत्साही होते. परीक्षेला बसलेले सर्वच्या सर्व २१ विद्यार्थी पास झाले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नऊ विद्यार्थ्यांनी ८०% पेक्षा जास्त तर १६ विद्यार्थ्यांनी ६०% पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत.

गरीब, गरजू आणि शिक्षणापासून वंचित असणाऱ्या पाचवी ते बारावी इयत्तेत शिकणाऱ्या जवळपास १५० विद्यार्थ्यांना आशा मुंबई संस्था शिक्षणाचा हात देत आहे. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून संस्थेने उच्च शिक्षित, समर्पित आणि पात्र शिक्षकांची निवड करत विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी काम करत आहे.

खडतर मार्गातून जावून बेस्ट मिळवण्याच्या त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या या जिद्दीमुळेच प्रत्येकवर्षी दहावी बारावीचा निकाल लागताच त्यांच्या यशस्वी विद्यार्थ्यांना पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकतो.

, , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!