पवई विहारचा रस्ता खड्डयात; नागरिक विद्यार्थ्यांचे हाल

पवई विहार येथील अंतर्गत रस्त्याला बनवण्याचा कामाचा मोठा धुमधडाक्यात गाजावाजा करत शुभारंभ करूनही अखेर या पावसाळ्यात ही रस्ता खड्डयात गेल्याचे समोर येत आहे. यामुळेच या भागात राहणाऱ्या नागरिकांची आणि येथील शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच दैना झाली असून, प्रवाशाला येथून घेवून जाण्यास रिक्षावाले मनाई करू लागले आहेत. त्यामुळे किमान रस्ता दुरुस्त तरी करा अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.

पवई विहार पवईच्या मुख्य भागांपैकी एक जीएचपी समूहाकडून बनवलेल्या या संकुलाची आपलीच एक ओळख निर्माण झाली आहे. एका बाजूला हिरानंदानी आणि दुसरीकडे लेकहोम यात घेरलेले असताना ही या परिसराने आपली ही स्वतंत्र ओळख टिकवून ठेवली आहे. मात्र पाठीमागील काही वर्षापासून हा परिसर एका मोठ्या प्रश्नाचा सामना करत असल्याचे समोर येत आहे. तो प्रश्न म्हणजे या परिसराचा ‘एक्सेस रोड’.

“आमच्या परिसरात आवश्यक त्या सर्व सुविधा आहेत. मात्र पाठीमागील काही दिवसांपासून आमच्या परिसरात प्रवेशाचा रोड मोठ्या दुरावस्थेत आहे. यासंदर्भात स्थानिक प्रतिनिधी यांच्याकडे आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत. फेब्रुवारी महिन्यात येथील स्थानिक आमदार दिलीप लांडे आणि नगरसेवक ईश्वर तायडे यांनी मोठ्या धुमधडाक्यात या रस्त्याचे काम सुरु करत असल्याचा समारंभ केला होता. पुढील काही महिने संपूर्ण परिसरात खोदकाम करत सगळी वाहतूक व्यवस्था विस्कळीत केली. मात्र अखेर काय तर रस्ता बनलाच नाही आणि आजही खड्डयाततून आम्हाला प्रवास करावा लागत आहे,” असे यासंदर्भात बोलताना पवईविहारकरांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “या परिसरात शाळा, कॉलेजेस सुद्धा आहेत. येथे येताना या खड्डयाच्या मार्गातून प्रवास करताना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे.”

या संदर्भात आवर्तन पवईने स्थानिक नगरसेवक ईश्वर तायडे यांना सतत दोन दिवस फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही. स्थानिक आमदार दिलीप लांडे हे शिंदे गटात सहभागी झाल्याने आणि गोव्यात असल्याने त्यांच्याशी संपर्क झाला नाही.

सध्या राजकीय उलथापालथीच्या काळात सर्व लोकप्रतिनिधी संपर्क कक्षेच्या बाहेर असल्याने किमान विकासकाने या समस्येत लक्ष घालत नागरिकांना तात्पुरता दिलासा तरी द्यावा अशी मागणी आता स्थानिकांकडून होत आहे.

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!