‘रन फॉर फौज’: अल्ट्रा-डिस्टन्स धावत पवईकराची ७१च्या युद्धातील योध्यांना मानवंदना

अरीत्रा बॅनर्जी - योद्याना मानवंदना

‘रन फॉर फौज मोहिमेच्या अंतर्गत भारताच्या लष्करी इतिहासाच्या महत्त्वाच्या घटनांच्या स्मरणार्थ पवईकर, २० वर्षीय तरुण आणि संरक्षण पत्रकार अरीत्रा बॅनर्जी यांनी सलग तीन आठवडे १० किमी, ५० किमीचे अल्ट्रामॅराथॉन, आणि मेलबर्न हाफ मॅरेथॉन (२१ किमी) धावत यावेळी लढलेल्या योध्यांना मानवंदना दिली.
१६ डिसेंबर हा दिवस आपण ‘विजय दिवस’ म्हणून साजरा करतो. याच दिवशी १९७१ साली भारताने पाकिस्तानविरुद्धची लढाई जिंकली होती.

याबद्दल बोलताना तो म्हणाला, “या मोहिमेचा भाग होण्यापूर्वी सुरुवातीस धावणे म्हणजे खुर्चीवरुन उतरून पाय मोकळे करून ताजी हवा मिळवणे एवढेच होते. व्हिक्ट्री इंडिया मोहिमेच्या १० वर्षांच्या स्मृतीदिनानिमित्त पुणे येथील माजी सैनिकांनी सुरू केलेली ही मोहीम आहे. #रनिंगफॉरफौज मोहीम १९७१ इंडो-पाक युद्धात कर्तव्य बजावताना आपले प्राण त्यागलेल्या आणि योध्यांना मानवंदना म्हणून ही मोहीम राबवली जात आहे. चालू वर्ष हे या संघर्षाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष (५० वे) आहे. लष्करी प्रशिक्षण आणि नेतृत्व सुधारणांसाठी तनामनापासून काम करणाऱ्या कर्नल विनय दळवी यांची ही संपूर्ण मेहनत आहे. यासाठी त्यांनी आपल्या लेखणीतून ७ लष्करी साहित्याची निर्मिती सुद्धा केली आहे.”

२०१०मध्ये दळवी यांचे पहिले पुस्तक ‘रोल मॉडेल’ प्रसिद्ध झाले आणि त्यानंतर आकार घेतलेले लेख व वादविवाद यांच्यात या मोहिमेचे मूळ आहे. प्रसारमाध्यमे, नोकरशाही आणि शैक्षणिक संस्था यांच्यात सुसंवाद आणि ज्ञानाची दरी कमी करण्याच्या उद्देशाने तयार केलेले ऑनलाईन पोर्टल या मोहिमेचे सध्याचे स्वरूप आहे. जेथे ज्येष्ठ, दिग्गज, शिक्षणतज्ज्ञ, लेखक यांच्या अनुभवी लेखनीतून आणि अंतर्दृष्टीने साकारलेले लेख तरुण अधिकाऱ्यांसाठी एक संसाधन म्हणून काम करतात.

योद्याना मानवंदना

‘बोर्न टू बॅटल कोर्स’

कोणतेही प्रशिक्षण नसताना एवढ्या मोठ्या आणि लांब अंतरावर धावण्याचा निर्णय का घेतला? असे विचारले असता तो म्हणाला, “आमच्या ऑनलाइन प्रकाशनास नुकतीचे सहा महिने पूर्ण झाले आहेत आणि यावर्षी व्हिक्ट्री इंडिया मोहिमेचे १० वर्षे देखील झाली आहेत. दशकाचे अंतर पार पाडलेल्या मोहिमेनिमित्त काहीतरी करण्याचा माझा हेतू होता. यासाठी १० किमी अंतर धावण्याचा मी निर्णय घेतला आणि टाटा स्टील १० किमी रनच्या माध्यमातून मला ही संधी मिळाली.”

तो पुढे म्हणाला, “मी काही काळापासून अल्ट्राथॉन धावण्याचा विचार करीत होतो आणि २०२१मध्ये यासाठी नोंदणी करण्यासाठी कार्यक्रम शोधत होतो. माझे वडील जे टाटा स्टीलमध्ये वरिष्ठ कॉर्पोरेट अधिकारी आहेत माझ्या या इच्छेबद्दल जाणून होते. त्यांनी मला टाटा अल्ट्रामॅराथॉन संघाने ५० किमीची रन आयोजित केल्याचे सांगितले. याबद्दल अधिक माहिती मिळवत असताना असे लक्षात आले की, कार्यक्रमाची तारीख आणि वेळ ही १९७१ भारत-पाक युद्धाच्या सुवर्णमहोत्सवी समारंभाशी आणि योगायोगाने कर्नल दळवी आणि आमच्यातील अनेक अधिकारी भारतीय सैन्य अकादमी (आयएमए) देहरादूनमधून युवा अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या दिवसाशी निगडीत आहे. देशाच्या लष्करी इतिहासाला आणि आमच्या अग्रगण्य सदस्यांच्या जीवनातील संघर्षाचे महत्त्व पाहता ५० वर्षांपूर्वी सैन्यदलांच्या निर्णायक शौर्यपूर्वक विजयाबद्दल आणि ‘बोर्न टू बॅटल कोर्स’ यांना मानवंदना वाहण्याची माझी स्वतःची पद्धत होती. ते माझ्या वयाच्या आसपास असताना या युद्धात लढले होते.”

२१ शीख रेजिमेंटला मानवंदना

२१ किमीच्या तिसऱ्या अंतराबद्दल बोलताना तो म्हणाला, “हाफ मॅरेथॉनमध्ये (२१ कि.मी.) हे अंतर काही ऐतिहासिक महत्त्व असणारे होते. . भारतीय सैन्याच्या सर्वात सुशोभित रेजिमेंट म्हणजे ‘शीख रेजिमेंट’चा १७५वा वर्धापन दिन साजरा होत आहे. ‘सारागढी शीख ऑफ सिरामनी’ या लेखात जनरल आर. एस. सुजलाना (सेवानिवृत्त) यांनी अतिशय उत्कटतेने अनुभव लिहिले आहेत. त्यांच्या या लेखात प्रसिद्ध सारागढीच्या लढाईचे युद्धवर्णन सांगताना, येथे १०,००० हून अधिक अफगाणी हल्लेखोरांविरूद्ध शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देणाऱ्या २१ शीख सैनिकांचा एक पुरता संदर्भ देण्यात आला आहे. सैनिकी इतिहासातील सर्वांत मोठ्या सैनिकी इतिहासाचा एक भाग असल्याने त्या पल्टनसाठी योग्य श्रद्धांजली ठरेल असे वाटल्यानेच ५० किमी अल्ट्रामॅराथॉन पूर्ण केल्यानंतर लगेचच मी हे २१ किमी अंतर पार करत २१ शीख सैनिक योध्यांना मानवंदना दिली.

योद्याना मानवंदना“माझा शीख रेजिमेंटशी विशेष संबंध आहे, पत्रकार म्हणून माझ्या सुरुवातीच्या काळात अनेकदा या रेजिमेंटच्या सैनिकांशी माझा संवाद झाला आहे. जे सर्व आश्चर्यकारकपणे शांत, सभ्य आणि आपल्या कामाप्रती एकनिष्ठ आहेत. मेलबर्न हाफ मॅरेथॉनचे २१ कि.मी. अंतर हे शीख योध्यांना आणि रेजिमेंटच्या स्मृतींना उपयुक्त श्रद्धांजली होती.”

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!