‘जनता कर्फ्यु’ला पवईकरांचा मोठा प्रतिसाद

‘जनता कर्फ्यु’ला पवईकरांचा मोठा प्रतिसादजगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना वायरसचा फैलाव जास्त प्रमाणात गर्दीच्या ठिकाणी होत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार २२ मार्चला ‘जनता कर्फ्यु’ची घोषणा करत जनतेला घरातच राहण्याची विनंती केली. या जनता कर्फ्युला पवईमध्ये नागरिकांनी घरात राहत मोठा प्रतिसाद दिला आहे.

पंतप्रधानांनी दिलेल्या हाकेला साथ देत पवई, चांदिवलीतील रहिवाशांनी घरातच राहण्याचा मार्ग निवडत याला मोठा प्रतिसाद दिला आहे. पवईतील हिरानंदानी हा मुंबईतील उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या वस्तीत शनिवार, रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत असते. पवईकरांसह मुंबईकर आपली सुट्टी साजरी करायला येथे येत असतात, मात्र आज या परिसरात शुकशुकाट पहायला मिळत आहे. तसेच या भागात असणाऱ्या अनेक कॉर्पोरेट कार्यालये आणि माल, दुकान मालकांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. सकाळी मॉर्निंग वाक, नाष्ट्यापासून हंगआउटसाठी असणारे कट्टे सुद्धा आज ओस पडले आहेत.

‘जनता कर्फ्यु’ला पवईकरांचा मोठा प्रतिसाद

चांदिवली म्हाडा, नहार रोड

चांदिवलीतील नहार, रहेजा विहार, लेकहोम सारख्या भागातही आज नागरिक घराबाहेर पडलेले आढळून आले नाहीत. याभागातही नागरिकांनी घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवणे पसंत केले आहे. चांदिवली फार्म रोडवर चांदिवली स्टुडीओ आणि बऱ्याच कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालये सुद्धा आहेत. मात्र या कार्यालयांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडून आणि शक्य त्यांना सुट्टी दिल्यामुळे या भागात असणारी गर्दी सुधा आज पाह्यला मिळाली नाही.

‘जनता कर्फ्यु’ला पवईकरांचा मोठा प्रतिसाद

चांदिवली फार्म रोड आणि डी पी रोड क्रमांक ९

आयआयटी पवई येथील भाजी मंडई, मासे बाजार हा आसपासच्या भागात राहणाऱ्या आणि खरेदीसाठी येणाऱ्या लोकांमुळे रविवारी पहाटेपासूनच गजबजलेला असतो. मात्र, आज हे सगळे बाजार बंद ठेवण्यात आल्यामुळे जनता कर्फ्युला प्रतिसाद देत आपल्या आणि देशाच्या स्वास्थ्याचा विचार करत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण परिसरात शुकशुकाट पहायला मिळत होता.

‘जनता कर्फ्यु’ला पवईकरांचा मोठा प्रतिसाद

आयआयटी मार्केट

आयआयटी मार्केट लगत असलेला कामगार नाका देखील दररोज सकाळी गजबजलेला असतो, मात्र आज जनता कर्फ्युमुळे त्या नाक्यावर सुद्धा शांतता बघायला मिळत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चैतन्यनगर आणि मार्केट परिसरात मंगळवारी व रविवारी भरणारा आठवडा बाजार देखील पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आला आहे.

आयआयटी मेनगेट

एकीकडे महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या ७४ तर मुंबईत २६ वर पोहचली असताना पवईकर या विषाणूंशी लढण्यासाठी पूर्णपणे सक्षम आणि तयार असल्याचे चित्रच आजच्या जनता कर्फ्यूच्या प्रतिसादातून पहायला मिळत आहे.

‘जनता कर्फ्यु’ला पवईकरांचा मोठा प्रतिसाद

चैतन्यनगर पवई

खैरानी रोड चांदिवली

चांदिवली फार्म रोड

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!