पवईकर लिखित ‘कम लेट्स शेक हॅन्डस विथ लाईफ’ पुस्तकाचे प्रकाशन

पवईकर शोनिमा कुमार लिखित ‘कम लेट्स शेक हॅन्डस विथ लाईफ’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पवईमध्ये पार पडले. मराठी आणि हिंदी मालिका कथा लेखिका सुषमा बक्षी आणि पवई इंग्लिश हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शरली उदयकुमार यांच्या हस्ते पवई इंग्लिश हायस्कूलच्या हॉलमध्ये हा सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाचे खरे आकर्षण ठरले ते कुमार यांच्या दोन्ही परिवारातील (माहेर-सासर) अगदी लहान मुलांपासून, जेष्ठांपर्यंत सर्वजन प्रोत्साहन देण्यासाठी आणि कौतुक करण्यासाठी उपस्थित होते.

एका मोठ्या पदावर काम करताना आलेले अनुभव आणि एक गृहिणी असणाऱ्या शोनिमा कुमार यांनी आपल्या अनुभवातून आणि काही काल्पनिक माध्यमातून २७ विविध अनुभवांना त्यांच्या या पुस्तकातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कुमार यांचे हे पहिलेच पुस्तक असून, जवळपास ३ वर्षांच्या मेहनतीनंतर ३ ऑक्टोबर रोजी त्यांचे हे पुस्तक प्रकाशित झाले.

सुधा मूर्ती यांना आपल्या आदर्श मानणाऱ्या कुमार यांच्या लेखनात सुधा मूर्ती यांच्या लिखाणाची शैली पाहायला मिळत आहे.

“आयुष्य म्हटले कि चढ उतार हे येतातच. अशावेळी अनेकजण हार मानतात, माघार घेतात. मात्र, जीवन सुंदर आहे. ते सुखकर तेव्हाच होते जेव्हा आपण त्याच्याशी हातमिळवणी करून मार्गावर पुढे पुढे चालत राहू. माझ्या या पुस्तकाच्या माध्यमातून मी काही खरे आणि काही काल्पनिक याच्यातून याच मुद्याला हात घातलेला आहे.” असे यावेळी बोलताना शोनिमा कुमार म्हणाल्या.

या पुस्तकात जीवन जगताना येणाऱ्या अनेक अडचणी आणि त्यांना कसे सामोरे जावे याबद्दल खूप चांगल्या पद्दतीने मार्ग दाखवण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे. जीवनातील खरे अनुभव आणि त्यांच्याशी केलेला सामना हे प्रत्येकाला प्रेरणा देतानाच आपणही हे करू शकतो असा विश्वास देतात.

हे पुस्तक ५ ऑक्टोबरपासून अमेझॉन, किंडल, फ्लिपकार्ट, गुगल पे सारख्या माध्यमांवर उपलब्ध असणार आहे.

लेखिकेबद्दल थोडेसे

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात एका नामांकित कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या शोनिमा कुमार यांनी माहिती तंत्रज्ञान विषयात पदवीधर आहेत. त्यांना लिखाणाची बालपणापासूनच आवड असून, वयाच्या १०व्या वर्षापासून त्या कविता आणि छोट्या छोट्या कथा लिहित आल्या आहेत. आयुष्य जगत असताना आलेले विविध अनुभव आपल्या डायरीत टिपून ठेवण्याची त्यांची सवय त्यांच्या या पुस्तकाचे लिखाण करताना खूपच उपयोगी पडली आहे.

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!