ज्युनियर नॅशनल अ‍ॅक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये पवईच्या अपेक्षा फर्नांडिसचा विक्रम

पवईकर जलतरणपटू अपेक्षा फर्नांडिस हिने ज्युनियर नॅशनल अ‍ॅक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये भाग घेत आणि सर्व ४ जलतरण शर्यतींमध्ये पदके जिंकत अजून एक विक्रम नोंदवला आहे. २०० मीटर वैयक्तिक मेडलीमध्ये नवीन राष्ट्रीय विक्रमासह सुवर्ण; ५० एमटी ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये नवीन राष्ट्रीय विक्रमासह सुवर्ण; २०० मीटर बटरफ्लाय स्ट्रोकमध्ये सुवर्णपदक तर १०० मीटर बटरफ्लायमध्ये रौप्य पदक मिळवत सिनियर नॅशनलच्या विद्यमान भारताच्या सर्वोत्तम वेळेला मोडीत काढले आहे.

४×१०० मेडले रिलेमध्ये टीम महाराष्ट्रासाठी रौप्यपदक जिंकण्यातही तिची भूमिका होती. तिच्या आश्चर्यकारक यशाने पुढील काळात येणाऱ्या स्पर्धेंसाठी नवीन मापदंड स्थापित केले आहेत.

अपेक्षा फर्नांडिस पवईची रहिवासी आहे. आयआयटी बॉम्बे पूल आणि हिरानंदानी फॉरेस्ट क्लब येथे डॉ मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली ती ट्रेनिंग घेत आहे. महामारीपूर्वी २०१९मध्ये तिने १४ वर्षाखालील ज्युनियर राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला होता. डिसेंबरमध्ये झालेल्या १३व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत जागतिक मंचावर तिने ३ सुवर्णपदक मिळवत देशाची मान अभिमानाने उंच केली होती.

कोविड निर्बंधांमुळे महाराष्ट्रात पूल बंद असल्याने ती केवळ गेल्या तीन आठवड्यांतच चांगले प्रशिक्षण घेवू शकली होती. विविध राज्यांमध्ये जिथे निर्बंध खूप पूर्वीपासून शिथिल झाले होते तिथे प्रशिक्षण घेत असलेल्या तिच्या प्रतिस्पर्ध्यांना तिने मात दिली आहे.

चॅम्पियनशिपसाठी पुरेसा सराव नसण्याच्या आव्हानाचा सामना केल्यामुळे अपेक्षाचा पराक्रम अधिक गुणवान आहे. तिची कामगिरी तिची जिद्द आणि यशस्वी होण्यासाठी चालना तसेच आव्हानात्मक परिस्थितीत तिचे धैर्य दर्शवते. तिचे आईवडील शालेट फर्नांडिस आणि डॉ. बेलॉन फर्नांडिस हे तिचे खूप मोठे आधारस्तंभ आहेत.

अपेक्षा तिच्या यशाचे श्रेय तिचे प्रशिक्षक डॉ. रेड्डी आणि श्री रितेश यांना देते, ती तिच्या शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापिका सौ मिल्ड्रेड लोबो आणि शिक्षक, संचालक, आयआयटी बॉम्बेचे उपसंचालक प्रा. सुभाषिस चौधरी, प्राध्यापक सुदर्शन आणि इतर यांनी दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल कृतज्ञ आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, आयुक्त इकबाल चहल यांनी कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करत प्रशिक्षणासाठी पूल उघडण्यासाठी आवश्यक परवानग्या मंजूर करून तिच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

शैक्षणिक आणि क्रीडा यांच्यात एक सुंदर समतोल साधत ती हे सर्व साध्य करते. अपेक्षा तिच्या समवयस्कांसाठी एक खरी आदर्श आहे कारण ती चॅम्पियन बनलेली आहे.

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!