पवईची मेरी कोम: किकबॉक्सिंग स्पर्धेत किमिक्षाचे पुन्हा सुवर्ण

बंट संघाच्या एसएम शेट्टी स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या किमिक्षा सिंगने ‘ऑल महाराष्ट्र कॅडेट आणि ज्युनिअर किकबॉक्सिंग चम्पिअनशिप २०२२’मध्ये आपली चुणक दाखवत पुन्हा एकदा अजून एक सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र आणि अहमदनगर किकबॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विध्यमाने बंधन लॉन येथे पार पडली. स्पर्धेत महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यातील १४६० स्पर्धक सहभागी झाले होते.

या स्पर्धेत मुंबई किकबॉक्सिंग असोसिएशनची किमिक्षा सिंगने दुहेरी सुवर्ण पटकावत स्पर्धेवर आपली छाप सोडली. किमिक्षा सोबतच मुंबई उपनगरमधील इतर खेळाडूंनीही आपली चमक दाखवत ६ सुवर्ण, ५ रौप्य व ६ कांस्य पदके अशी एकूण १७ पदके पटकावत चमकदार कामगिरी केली.

यापूर्वीही किमिक्षाने विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग चँपियनशिपमध्ये आपली चमक दाखवत सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक आपल्या नावे केली आहेत. या युवा लढाऊ क्रीडा अ‍ॅथलीटने देशाचा ध्वज उच्चांकीत केला आहेच, शिवाय असंख्य तरुण मुली आणि मुलांना लढाऊ क्रीडा कलेच्या आयुष्यात प्रवेश करण्यासाठी प्रेरित केले आहे.

, , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!