रमाबाई आंबेडकर नगर येथील सार्वजनिक शौचालयाचे लोकार्पण

स्थानिक आमदार सुनील राऊत यांच्या निधीतून व शाखाप्रमुख सचिन मदने यांच्या प्रयत्नांने माता रमाबाई आंबेडकर नगर -१ येथील १६ सीट सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून, आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते पवईकर आणि शिवसैनिक यांच्या उपस्थितीत शुक्रवार ७ मार्च रोजी या शौचालयाचे लोकार्पण पार पडले.

पवई हा उच्चभ्रू वस्ती सोबतच चाळ सदृश्य वस्तीचा परिसर म्हणून ओळखल जातो. सध्या उंचच्या उंच आकाशाला भिडायला जाणाऱ्या इमारतीच्या ओळख असणाऱ्या पवईची खरी सुरुवात ही येथील चाळ सदृश्य लोकवस्तींमध्ये आहे. मात्र पाठीमागील काही वर्षात हा परिसर दुर्लक्षित झालेला दिसत आहे. यातील अनेक परिसरातील नागरिक अजूनही पाणी, गटारे, शौचालये, स्वच्छता सारख्या अनेक प्राथमिक गरजांपासून वंचित आहेत.

काही भागात बांधण्यात आलेल्या शौचालयांची डागडुजी, स्वच्छता होत नसल्याने निरुपयोगी ठरत आहेत. हेच विचारात घेत स्थानिक आमदार सुनील राऊत यांच्या फंडातून आणि शिवसेना शाखाप्रमुख सचिन मदने यांच्या प्रयत्नातून रमाबाई आंबेडकर नगर -१ येथील १६ सीट सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले आहे. नुकतेच त्याचे लोकार्पण पार पडले.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!