लॉकडाऊन दरम्यानही प्राण्यांसाठी काम करणारे खरे अवलिया

कोविड-१९ महामारीच्या लॉकडाऊन काळातही प्राणी आणि निसर्गाच्या रक्षणासाठी पॉज मुंबई आणि अम्मा केअर फाऊंडेशन (एसीएफ) सतत कार्यरत आहे. आता अजून एक पाऊल पुढे टाकत एसीएफतर्फे प्राण्यांना मदत करण्यासाठी ‘फेडरेशन ऑफ इंडियन एनिमल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन’ (एफआयएपीओ) आणि प्लांट एण्ड अ‍ॅनिमल वेलफेअर सोसायटी (पॉज-मुंबई) यांच्या सहकार्याने ‘एसीएफ हेल्पिंग हँड फॉर द वॉयलेसलेस’ हा उपक्रम सुरू केला आहे. कोविड-१९ हा साथीचा रोग सर्व देशभर पसरला आहे. याकाळात संस्थेतर्फे अनेक कार्य केली गेली आहेत. इथून पुढील काळातही भटक्या आणि मुक्त प्राण्यांना जेवण देणे, खाद्य पुरविणे, जनावरांना प्रथमोपचार किट पुरविणे, लसीकरण आणि वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी हा नवीन उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन भांडूप प्रभागातील नगरसेविका जागृती पाटील यांच्या हस्ते झाले.

कोविड-१९ महामारीमुळे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून एसीएफ आणि पॉज-मुंबई प्राण्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी कार्य करत आहे. अन्न पुरठ्यापासून, बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी), पोलिस आणि वनविभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने हे प्राणी रक्षण आणि बचावाचे कार्य सुरु होते. कोविड रुग्ण सापडलेल्या बंद घरांमधून जनावरांची सुटका करण्यात ते अग्रणी होते. “त्यांचे मालक बरे होवून घरी येईपर्यंत त्या प्राण्यांची काळजी घेणे. सेलिब्रिटी आणि पशुवैद्यकांच्या मदतीने जनजागृती करणे, पाळीव जनावरांना दत्तक देण्यास मदत करणे. शिवाय वन्य प्राण्यांसाठी वनविभागाच्या मदतीने पुनर्वसनास मदत करणे अशी अनेक कार्य संस्थेतर्फे करण्यात येत आहेत. एवढेच नव्हे तर गरजू स्वयंसेवकांना मासिक घरगुती मदत सुद्धा केली जात आहे.” असे पॉज-मुंबई सचिव तथा मानद जिल्हा पशु कल्याण अधिकारी सुनिष सुब्रमण्यन यांनी सांगितले.

सुनिष पुढे म्हणाले की, “आम्ही स्वयंसेवकांच्या कल्याणासाठी सर्व सुरक्षित पावले उचलत आहोत. जे बचावाच्या कामात गुंतले आहेत त्या स्वयंसेवकांना मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर आणि होमिओपॅथिक औषध पुरवली जात आहेत. साथीची स्थिती अस्तित्त्वात आहे तोपर्यंत हा कार्यक्रम त्याच समर्पणासह सुरू ठेवला जाईल.”

एसीएफ हेल्पिंग हँड फॉर व्हॉईसलेस उपक्रमांतर्गत १०६८ भटक्या जनावरांना आहार; ज्यात ६७५ कुत्री आणि ३९३ मांजरीचा समावेश आहे. मुंबई, मीरा भाईंदर, नायगाव (वसई-विरार) आणि पनवेल या चार नगरपालिकांमधील २३ स्वयंसेवक आणि प्राणीप्रेमींच्या मदतीने दिवसातून दोन वेळा तांदूळ, डॉग फूड, मांजरीचे भोजन, बिस्किटे सारख्या सुविधा पुरविल्या जातात. मूलभूत प्रथमोपचार किट प्राणी प्रेमींना दिले जात आहे जेणेकरून ते स्वत: हून प्राथमिक उपचार करण्यास स्वतंत्र असतील.

“एसीएफ-पॉज-मुंबई पशुवैद्यकीय संस्थेमार्फत गरजू प्राण्यांना तातडीची वैद्यकीय मदत देण्याच्या प्राणी प्रेमींच्या विनंतीनंतर सुमारे ३०० प्राण्यांना रेबीजवरील लसी देण्याचे नियोजन आहे.” असे याबाबत बोलताना एसीएस सचिव निशा कुंजू यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या, “एसीएफ पॉज-मुंबई प्राण्यांसाठी अविरत कार्य करणाऱ्या लोकांना ‘कोरोना वॉरियर फॉर वॉयलेसलेस’ कौतुक प्रमाणपत्र देऊन सन्मान करीत आहे. ज्यांनी कोविड-१९ साथीच्या परिस्थितीत निर्भिडपणे प्राण्यांना मदत केली त्यांना हा सन्मान दिला जाणार आहे.

कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर जागृती पाटील म्हणाल्या की, एसीएफ आणि पॉज-मुंबई यांच्या पथकाने एफआयएपीओच्या मदतीने सुरू केलेला हा उपक्रम भटक्या प्राण्यांसाठी आणि त्यांच्या काळजीवाहूंसाठी कोविड-१९ साथीच्या आजाराच्या परिस्थितीत खरोखर मोठा दिलासा देणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेल्या संदेशादरम्यान ते म्हणाले की, आम्हाला करुणाने कोरोनाशी लढावे लागेल. आम्हाला भटक्यांची काळजी घ्यावी लागेल. या लॉकडाऊनमुळे पक्षी आणि प्राणीसुद्धा उपाशीच आहेत. सर्वांना माझी नम्र विनंती, कृपया आपल्या सभोवतालच्या पक्षी आणि प्राण्यांची काळजी घ्या.”

एसीएफ पॉज- मुंबई संघाशी 9833480388 वर संपर्क साधू शकतात.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!