पवई तलावाची दुरुस्ती; पालिका गळती रोखून सुरक्षित करणार तलाव

मुंबईची शान मानल्या जाणाऱ्या पवई तलावाची सगळ्याच बाजूने दुर्दशा होण्याच्या मार्गावर असतानाच महानगरपालिका प्रशासनाने आता याच्या दुरुस्तीसह गळती रोखण्याच्या निर्णय घेतला आहे.

पश्चिम उपनगरातील महत्वाच्या काही पर्यटन स्थळांपैकी एक असणाऱ्या पवई तलाव भागास लाखोंच्या संख्येने पर्यटक भेटी देत असतात. मात्र, गेल्या काही वर्षात तलाव भागात आणि तलावाच्या झालेल्या दुर्दशेमुळे पर्यटक याकडे पाठ फिरवू लागले आहेत. पर्यटकांचे खास आकर्षण असणाऱ्या या तलावाच्या विविध भागातील दुरुस्तीसह गळती रोखण्यासाठी पालिका पुढे सरसावली आहे. गळती थांबवून त्याची सुरक्षा वाढवण्यात येणार आहे. नाशिकच्या धरण सुरक्षा समितीच्या अहवालानुसार या तलावाचे बांधकाम सुरक्षित करण्यात येईल. यासाठी अंदाजे तीन कोटी रुपये पालिका प्रशासनाने राखून ठेवले असल्याचे सांगण्यात येत आहे.

तलावांच्या सुरक्षेसाठी नाशिक येथील महाराष्ट्र राज्य शासनाच्या धरण सुरक्षा समितीकडून पाहणी करून नियमित उपाययोजना सुचविल्या जातात. पवई तलावाची पाहणी करून यासाठी सुद्धा समितीने एक अहवाल दिला होता. याच अहवालानुसार पालिकेच्या माध्यमातून हे काम हाती घेतले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात आला.

पवई तलावाची दुरुस्ती आणि गळती रोखण्यासाठी, ओव्हरफ्लो पाटाची दुरुस्ती करणे, जलाशय पातळी दर्शवणाऱ्या मोजपट्टीचे नुतनीकरण, गळती रोखण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी क्रिस्टलाइन ग्राउटिंग करून दुरुस्ती, डाऊन स्ट्रीम तळ भागाची झीज रोखण्यासाठी काँक्रीटीकरण करणे अशी कामे केली जाणार आहेत.

पवई तलावात मोठ्या प्रमाणात मगरींचे साम्राज्य आहे. तसेच पर्यटकांच्या अतिउत्साहीपणामुळे येथे अनेकदा दुर्घटना सुद्धा घडल्या आहेत. तलावाला लागून असलेल्या बाबासाहेब आंबेडकर उद्यानात समाजकंठक उच्छाद मांडत असल्याने सूचना फलक, निर्देश देणाऱ्या पाट्या लावणे, संरक्षक भिंत, कुंपण, लोखंडी जाळी लावणे अशी कामे सुद्धा येथे केली जाणार आहेत.

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!