चांदिवली येथे रिंक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

@ सुषमा चव्हाण

चांदिवली येथे रिंक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ५, ६ व ७ जानेवारीला चांदिवली म्हाडा येथील मैदानात ही स्पर्धा होणार आहे. अंध मुलांच्यात होणारी फुटबॉल सामना हे या स्पर्धेचे आकर्षण असणार आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात फुटबॉल या खेळाला चालना मिळावी यासाठी नियमित प्रयत्नशील असणारे शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांच्या प्रेरणेतून, शिवसेनेच्या नगरसेविका चित्रा सोमनाथ सांगळे व युवासेना चांदिवली विधानसभा सचिव बालाजी सोमनाथ सांगळे यांच्यावतीने रिंक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘हिंदूहृदयसम्राट चषक २०१८’ या नावाने आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धांचे पाचवे वर्ष आहे. युवक, युवती, आणि ज्येष्ठ नागरिक अशा तीन गटात ही स्पर्धा होणार आहे. इंडियन ब्लाइंड फुटबॉल फेडरेशनच्या (आयबीएफएफ) वतीने अंध मुलांचा फुटबॉल सामना हे याचे विशेष आकर्षण असणार आहे.

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes