साकीविहार रोडवर जबरी चोरी; महिलेचे दागिने पळवले

https://www.facebook.com/alinasalonpowaiiपवईत चोरी, जबरी चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये अजूनही काहीच फरक पडला नसून, शुक्रवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास साकीविहार रोडवर एका महिलेच्या जवळील सोन्याचे दागिने जबरी चोरी केल्याची घटना घडली. यासंदर्भात पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

तुंगागाव परिसरात राहणाऱ्या सुगंधा महाडिक (बदलेले नाव) यांचा व्यवसाय असून, त्या शुक्रवारी पहाटे व्यवसायासाठी लागणारे पाव आणण्यासाठी साकीविहार रोडवर आले होते. दोन अज्ञात चोरट्यांनी गाडीवरून येत त्यांनी घातलेले शरीरावरील सोन्याचे दागिने जबरीने हिसकावून चोरून पळ काढला.

“तक्रारदार या पाव घेवून परतत असताना आपल्या सावजाच्या शोधात रस्त्यावर फिरत असणाऱ्या चोरट्यांनी जवळ जात, पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने त्यांनी गळ्यात घातलेले सोन्याचे दागिने खेचून तिथून पळ काढला,” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “आम्ही परिसरातील सिसिटीव्ही फुटेज मागवले आहे. लवकरच आरोपी आमच्या ताब्यात असतील. मात्र या निमित्ताने आमची नागरिकांना एक विनंती आहे कि, नागरिकांनी मोर्निंग वॉक किंवा इतर तत्सम कामासाठी पहाटे घराबाहेर पडताना मौल्यवान वस्तू बाळगणे, घालणे टाळावे.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!