रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पवईतर्फे कामगार महिलांना सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पवईतर्फे घरकाम किंवा इतर मदतनीस म्हणून काम करणाऱ्या ३५० महिलांना सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करून वैयक्तिक स्वच्छता राखण्याचे महत्त्व आणि प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. संक्रांतीच्या निमित्ताने एकता महिला समितीच्या पार्कसाईट येथील कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.

एकता महिला समिती ही सुश्री आरती चावला (बागुल) यांनी स्थापन केलेली एक स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेत ३५० महिला सदस्य आहेत ज्या बहुतेक घरकाम, आया किंवा पवई आणि आसपासच्या परिसरात चतुर्थ श्रेणी कामगार म्हणून काम करत आहेत. या सर्व महिला आर्थिकदृष्ट्या वंचित स्तरातील आहेत.

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पवईमधील सविता गोविलकर यांनी संक्रांती हळदीकुंकू समारंभाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पवईतर्फे सर्व ३५० महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स पॅकेट आणि स्टेनलेस स्टील प्लेट्सचे वाटप करण्यात आले. तर एकता महिला समितीच्यावतीने सर्व महिलांना फुल व तिळाच्या मिठाईचे वाटप करण्यात आले. स्थानिक डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार आरती यांनी महिलांना वैयक्क्तिक स्वच्छतेची प्रक्रिया आणि स्वच्छता राखण्याचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते.

, , , , ,

Comments are closed.

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!
%d bloggers like this: