२.५ लाखाच्या ९० रेल्वे तिकिटांसह बनावट एजंटला पवईतून अटक

एका प्रवाशाने बनावट तिकीट विकली जात असल्याच्या सोशल माध्यमावर केलेल्या तक्रारीच्या आधारावर २८ वर्षीय रिअल इस्टेट एजंटला रेल्वे सुरक्षा दलाने सोमवारी पवई येथून अटक केली आहे. अंधेरी रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) कारवाई केली. निलेश पटेल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पवई येथील आपल्या घरातून ट्रेनचे तिकीट बेकायदेशीरपणे विकण्याचे काम तो करत होता. झडतीत २.५ लाख रुपयांची वैध्य ९० तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. तर ५.५ लाख रुपयांच्या तिकिटाचे आणखी संचही हस्तगत करण्यात आले आहेत.

प्रवाशाने ट्वीटरच्या माध्यमातून एक व्यक्ती पुष्टी (कन्फर्म) तिकीट जादाच्या दरात विकत असल्याची तक्रार आरपीएफला केली होती. आरपीएफने त्याला त्याच्याबद्दल अधिक माहिती देण्यास सांगितली असता त्याने आपली ओळख देण्यास टाळले होते. मात्र नंतर त्याने काही गोष्टींचा खुलासा केला.

आरोपी हा घरातून काम करत असल्याने त्याला शोधणे कठीण असल्याने आरपीएफने तक्रारदाराला एक तिकिट बुक करून त्यांचे विवरण त्यांना देण्याची विनंती केली.

‘तिकिट आयडीच्या आधारावर भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) कडून तपशील प्राप्त करून, ज्या खात्यात पैसे जमा झाले होते त्याची माहिती मिळवण्यात आली. सदर खाते तपासले असता त्यातून अनेक व्यवहार करण्यात आले होते. काही पेमेंट नेपाळमधील दुसऱ्या एका खात्यावर केले असल्याचे समोर आले. असे एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या माहितीत आरपीएफ अधिकाऱ्याने सांगितले.

आरपीएफ सब-इंस्पेक्टर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एक टिम तयार करून पवई येथे घरी छापा टाकून पटेलला अटक करण्यात आली.

पटेल नेपाळमधून कोरी तिकिट खरेदी करून नंतर त्यावर कन्फर्म तिकिटांची माहिती प्रिंट करून त्यांना मुंबईतील प्रवाशांना विकत असल्याचे तपासात उघड झाले आहे. उत्तरप्रदेश व बिहारच्या भागात प्रवास करणाऱ्या आणि तिकीट पुष्टी न-झालेल्या किंवा तिकीट मिळणे कठीण असणाऱ्या लोकांनाच तो तिकीट विक्री करे.

आरपीएफ अटक आरोपी पटेल याच्याकडे अधिक तपास करत आहेत.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!