आयआयटीच्या विद्यार्थिनीला ऑनलाईन पिझ्झा मागवणे पडले महागात, सायबर चोरांचा २७ हजाराचा चुना

आयआयटी मुंबईच्या पवई कॅम्पसमध्ये शिकणाऱ्या एक विद्यार्थिनीला ऑनलाईन पिझ्झा मागवणे चांगलेच महागात पडले आहे. खराब डिलीव्हर झालेल्या पिझ्झाच्या भरपाई रकमेला मिळवण्याच्या नादात सायबर चोरांच्या जाळ्यात अडकून तिला आपल्याच खात्यातील २७ हजार रुपये गमवावे लागले आहेत. पवई पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयआयटी पवई कॅम्पसमध्ये शिकणाऱ्या सीचा वाजपेयी हिने ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या ऍपच्या साहाय्याने एक पिझ्झा मागवला होता. काही वेळातच तिला हा पिझ्झा डिलिव्हरी झाला, मात्र तिने त्याचा बॉक्स उघडून पाहिला असता आतील पिझ्झा खराब असल्याचे आढळून आले. या संदर्भात तिने त्वरित संबंधित कंपनीला इमेल करून याची माहिती दिली.

बरेच दिवस उलटूनही इमेलचा काहीच रिप्लाय आला नसल्याने तिने त्या कंपनीचा ऑनलाईन नंबर सर्च करून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क झाला नाही.

“काही वेळाने एक इसमाने फोन करून तो त्या कंपनीच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगत काय मदत करू शकतो? अशी तिच्याकडे विचारणा केली. तरुणीने सर्व हकीकत सांगताच त्याने एक कोड पाठवतोय तो ‘गुगल पे’मध्ये स्कॅन करा, पैसे तुमच्या खात्यात जमा होतील असे तरुणीला सांगितले, असे याबाबत बोलताना पोलीस सूत्रांनी सांगितले.

तरुणीने कोड स्कॅन करताच तिच्या खात्यातून २६९०० रुपये वजा झाल्याचा संदेश तिला प्राप्त झाला. यासंदर्भात तिने पवई पोलिसात धाव घेत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पवई पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!