जेविएलआरवर आयआयटी मार्केट गेटजवळ धावत्या कारला आग

जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर पवई येथील आयआयटी मार्केट गेटजवळ एका कारला आग लागल्याची घटना आज, शुक्रवार १२ मार्चला संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. जोगेश्वरीच्या दिशेने आलेली ह्युंडाई एक्सेंड कार क्रमांक एमएच ४७ एन ५८७६ ही टूरिस्ट कार गांधीनगरच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. गाडीच्या इंजिन भागातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी बाजूला घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेत कोणीही जखमी झाले नसून, स्थानिक नागरिक आणि प्रवाशांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!
%d bloggers like this: