पवईत जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर धावत्या ट्रकला आग

पवई – जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरून निघालेल्या एमएच ०४ एचडी १२७० धावत्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना रविवारी सकाळी पवईत घडली. इंजिनमध्ये बिघाड होऊन धावत्या ट्रकला आग लागल्याचे वाहनचालकाने सांगितले. वाहनाच्या टायरला आणि डिझेल टँकला याची झळ बसली. स्फोट होण्यापूर्वीच अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर आयआयटी मेनगेटजवळ पवईत ही घटना घडली. मेट्रोचे लोखंडी गर्डेल घेऊन ट्रक गोरेगावहून पनवेलकडे निघाला होता. ट्रक पवई आयआयटी मेनगेटजवळ पोचला तेव्हा इंजिनमधून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. आधी किरकोळ वाटणारी ही आग इंधनाच्या टाकीकडे जाताना तिने टायरना आपल्या विळख्यात घेतले. अग्निशामक दलाचे वाहन तातडीने पोहोचल्याने पुढचा अनर्थ टळला.

रस्त्यावरच ट्रकने पेट घेतल्याने पाठीमागून येणारी वाहने थांबली होती. त्यामुळे जेव्हीएलआरवर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

, , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!