पवई तलाव वाचवण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांची पवईकरांशी चर्चा

meet-bmcवई तलावात सोडल्या जाणाऱ्या घाण पाण्यामुळे पवई तलावाचे होणारे प्रदूषण तसेच त्याच्या सुशोभिकरणावेळी घ्यावयाच्या उपाययोजना आणि नियोजनबद्द कामावर चर्चा करण्यासाठी पालिकेच्या हायड्रोलिक विभागाच्यावतीने त्यांच्या भांडूप येथील कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी पॉज मुंबई संस्थेचे सुनिश सुब्रमण्यम, निशा कुंजू, यंग इन्वायरमेंट संस्थेच्या ईलसी गेब्रील, आशा संस्थेचे पदाधिकारी आणि पवईकर उपस्थित होते. हायड्रोलिक विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पवईकर जनतेच्या प्रतिनिधींशी याबाबत चर्चा करून त्यांच्या हरकती आणि सूचना यावेळी समजून घेतल्या.

पवईची शान आणि मुंबईकरांसाठी हक्काचे पर्यटनस्थळ असणाऱ्या पवई तलावात गटाराचे पाणी सोडल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण झाले आहे. परिसरातून जाताना उग्र वास येत असून, येथील जैवविविधता सुद्धा धोक्यात आली आहे. तलावात असणाऱ्या जलचर व मगरींच्या जीवाला असणारा धोका पाहता याबाबत पर्यावरणवादी संघटनेनी तलावात सोडले जाणारे गटाराचे आणि दुषित पाणी त्वरित बंद करण्याची मागणी केली होती.

पालिकेसह,  मुख्यमंत्री, केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय यांच्याकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या. यावर पालिकेने उपाययोजना म्हणून छोटा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारून पाणी तलावात सोडण्याचा घाट घातला होता. मात्र, पर्यावरणवादी संघटनांनी हा प्रकल्प काही दिवसातच बंद पडेल आणि पुन्हा दुषित पाणी तलावात जाईल असा विरोध दर्शवल्याने अखेर हा प्रकल्प सुद्धा बासणात गुंडाळला.

अखेर पालिकेने यावर उपाय म्हणून पवईकर जनता आणि पर्यावरणवादी संस्था यांच्याशी चर्चा करून पुढील पावले टाकण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी यांच्या प्रतीनिधीशी बैठक बोलावून त्यांच्या हरकती आणि सूचना अधिकाऱ्यांनी समजून घेतल्या.

यावेळी यंग इन्वायरमेंट संस्थेच्या ईलसी गेब्रील यांनी एलएंडटी ते मुख्य विसर्जन घाट येथील अनेक भाग उपयोगात नाही त्याचा विकास करावा. येथील भागातून येणारे सांडपाणी रोखले जावे अशा सूचना केल्या.

पवई तलाव वाचवण्यासाठी अग्रस्थानी असणाऱ्या पॉज मुंबई संस्थेने घाण पाणी त्वरित रोखण्यात यावे. मगरीसाठी टेकड्या बनवण्यात याव्यात, हेच मगर पार्क असेल. स्थानिक मच्छिमारांना दगडी बांधकाम करून एक नियंत्रण रेषा आखून त्यात मच्छिमारीसाठी परवानगी द्यावी. याच भागात सर्व गणेशमूर्तींचे  विसर्जन करण्यात यावे, ज्यानंतर सर्व मलबा काढून टाकण्यात यावा. म्युजिकल फाऊटेन पवई तलाव ऐवजी आंबेडकर उद्यानात हलवावे. पवई तलाव भागात नागरिकांसाठी बाथरूम आणि पिण्याच्या पाण्याची सोय ठिकठिकाणी करण्यात यावी. पवई तलाव बचाव आणि नियंत्रण संस्था स्थापन करण्यात यावी ज्यात स्थानिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांचा समावेश असावा, अशा बऱ्याच सूचना पालिकेला केल्या आहेत.

विविध पर्यावरणवादी संस्था आणि पवईकरांनी केलेल्या सूचना आणि हरकती यावर वरिष्ठाशी चर्चा करून त्यानुसार येथून पुढील कामकाजाला सुरुवात होणार आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!